सूरत 18 नोव्हेंबर: सूरत मध्ये कोरोनाचं संकट अजुन गेलेलं नाही. हे आव्हान असतानाच सूरत मधल्या ट्राय स्टार हॉस्पिटलला बुधवारी भीषण आग लागली. या हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटरही आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आग लागली तेव्हा हॉस्पिटलमध्ये 19 रुग्ण होते त्या सगळ्यांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आलं असून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. फायर ब्रिगेडने काही तासांच्या प्रयत्नानंतर या आगीवर ताबा मिळवला.
हॉस्पिटलच्या सर्व्हर रुमला ही आग लागली होती. त्यानंतर झपाट्याने आग पसरत गेली. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये धुर पसरला. यात कोविड वॉर्डचाही समावेश आहे. यावेळी हॉस्पिटलमध्ये 19 पेशंट्स होते. आग आणि धुरामुळे मदत कार्यात अडथळे येत होते. सूचना मिळाल्यानंतर काही वेळातच फायर ब्रिगेडचे कर्मचारी हजर झाले. त्यांनी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सर्व रुग्णांना बाहेर काढलं.
हे करत असताना काही रुग्णांना त्रास झाला. मात्र सर्व रुग्णांना सुरक्षित स्थळी पोहोचविण्यात फायर ब्रिगेडला यश आलं. आगीचं कारण शोधण्यात येत आहे. योग्य पद्धतीने देखभाल झाली नसल्यामुळेच सर्व्हर रुमला ही आग लागली असावी अशी शक्यताही फायर ब्रिगेडने व्यक्त केली आहे.
सूरत मधल्या ट्राय स्टार हॉस्पिटलला बुधवारी भीषण आग लागली. या हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटरही आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आग लागली तेव्हा हॉस्पिटलमध्ये 19 रुग्ण होते त्या सगळ्यांना सुरक्षीत बाहेर काढण्यात आलं आहे. pic.twitter.com/UdgBBMniZo
— News18Lokmat (@News18lokmat) November 18, 2020
काही रुग्णांची परिस्थिती गंभीर होती. मात्र हलवणं हे आव्हानाचं काम होतं. मात्र त्या सगळ्या रुग्णांना बाहेर काढण्यात यश मिळालं. आता त्या सगळ्या रुग्णांवर उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीला धोका नाही असं हॉस्पिटल प्रशासनाने म्हटलं आहे.