गुजरात निवडणुकीमध्ये VVPAT पडताळणीची काँग्रेसची याचिका कोर्टाने फेटाळली

गुजरात निवडणुकीमध्ये VVPAT पडताळणीची काँग्रेसची याचिका कोर्टाने फेटाळली

"मतदारांनी केलेलं मतदान आणि VVPAT ची चिठ्ठी यात काही फरक तर नाहीये ना याची पडताळणी करण्यासाठी एकूण मतदानाच्या किमान २५ टक्के मतं आणि VVPAT हे समान आहेत की नाही"

  • Share this:

15 डिसेंबर : गुजरात निवडणुकीच्या मतमोजणीदरम्यान मतदारांनी केलेलं मतदान आणि VVPAT ची चिठ्ठी यात काही फरक तर नाहीये ना याची पडताळणी करण्यासाठी एकूण मतदानाच्या किमान २५ टक्के मतं आणि VVPAT हे समान आहेत की नाही हे तपासण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने  द्यावेत अशी मागणी करणारी गुजरात काँग्रेसनं केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

काँग्रेसच्या याचिकेत काही तथ्य नसल्याचं मत सुप्रीम कोर्टाने व्यक्त केलं. तसंच निवडणूक पद्धतीत काही सुधारणा अपेक्षित असल्यास पक्षानं त्या संदर्भात रिट याचिका दाखल करावी असंही कोर्टाने म्हटलं आहे. ही पडताळणी केल्यास जनतेचा निवडणूक प्रकियेवरचा विश्वास वाढण्यास मदत होईल असं काँग्रेसचं म्हणणं होतं.

यापूर्वी ईव्हीएममध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. त्यानुसार मतदारांना चिठ्ठीद्वारे आपण मतदान केलेल्या उमेदवारालाच मत गेलं आहे की नाही याची पडताळणी करता येते. पण त्यावरही आता काँग्रेसनं शंका व्यक्त करत ही याचिका दाखल केली होती.

First published: December 15, 2017, 6:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading