गुजरात निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी आज मैदानात

गुजरात निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी आज मैदानात

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चारपैकी तीन सभा सौराष्ट्रात घेणार आहेत तर राहुल गांधीचा आजचा संपूर्ण दौरा सौराष्ट्रात आहे.

  • Share this:

29 नोव्हेंबर : आज गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसचा जोरदार प्रचार होणार आहे. दोन्ही पक्षाचे प्रमुख नेते आज गुजरातच्या मैदानात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज चारपैकी तीन सभा सौराष्ट्रात घेणार आहेत तर राहुल गांधीचा आजचा संपूर्ण दौरा सौराष्ट्रात आहे.

पंतप्रधान मोदी मोरबी, जुनागढ जिल्ह्यातील प्राची, भावनगर जिल्ह्यातील पालिटाना या सौराष्ट्रातील भागात प्रचार सभा घेतील तर दक्षिण गुजरातमधील नवसारी येथे प्रचारसभा घेतील.

तर राहुल आज गिर सोमनाथ, जुनागढ अमरेली या जिल्ह्यांच्या जाऊन प्रचार करणार आहेत. तर पाटीदार अनामत आंदोलन समितीचा नेता हार्दिक पटेल हा देखील आज सौराष्ट्र्त जाऊन प्रचार करणार आहे.

हार्दिक पंतप्रधान मोदी मोरबी जिल्ह्यात सकाळी ९ वाजता प्रचार करणार आहे. त्याचवेळी त्याच जिल्हयात कालवाड इथं प्रचार करणार आहे. तसंच त्यानंतर त्याची राजकोट इथं सभा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 29, 2017 09:25 AM IST

ताज्या बातम्या