गुजरात निवडणूक : तिकीट न दिल्यामुळे भाजप प्रवक्ताचा पक्षकार्यालयावरच हल्ला

गुजरात निवडणूक : तिकीट न दिल्यामुळे भाजप प्रवक्ताचा पक्षकार्यालयावरच हल्ला

"भाजपचे स्थानिक प्रवक्ते आय के जडेजा यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळे..."

  • Share this:

18 नोव्हेंबर : गुजरात निवडणुकीत राजकीय पारा चढू लागला आहे. तिकीट वाटपावरुन नाराज असलेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयावरचं हल्ला केला.

भाजपने शुक्रवारी आपली पहिली 75 उमेदवारांची यादी जाहीर केलीये. या यादीत 55 विद्यमान आमदारांचा पुन्हा तिकीट देण्यात आलंय. तर 15 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलीये.  भाजपचे स्थानिक प्रवक्ते आय के जडेजा यांना तिकीट नाकारण्यात आलं. त्यामुळे आपल्याला तिकीट न दिल्यामुळे जडेजा यांच्या समर्थकांनी भाजपच्या पक्ष कार्यालयाला लक्ष्य बनवलंय. कार्यालयावर हल्ला करून तोडफोड केलीये.

तर दुसरीकडे काँग्रेस एनसीपीच्या दरम्यान जागावाटपावरुन तणाव निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं गुजरात विधानसभेत युती करण्यासाठी काँग्रेस पक्षाकडे २० जागांची मागणी केली आहे. गुजरात विधानसभेच्या एकूण १८२ जागा असून राष्ट्रवादीचा आता गुजरातमध्ये एकही आमदार नाही.

First published: November 18, 2017, 7:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading