Home /News /national /

राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात, गुजरातमध्ये काँग्रेस नेते बद्रुद्दीन शेख यांचा मृत्यू

राजकीय नेतेही कोरोनाच्या विळख्यात, गुजरातमध्ये काँग्रेस नेते बद्रुद्दीन शेख यांचा मृत्यू

बद्रुद्दीन शेख हे कॉंग्रेसचे नगरसेवक आणि अहमदाबाद महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते.

    अहमदाबाद, 27 एप्रिल : देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालला असून सर्वच स्तरातील लोकांपर्यंत या व्हायरसचा संसर्ग पोहोचला आहे. कोरोनामुळे गुजरातमधील कॉंग्रेस नेते बद्रुद्दीन शेख यांचा मृत्यू झाला आहे. बद्रुद्दीन शेख हे कॉंग्रेसचे नगरसेवक आणि अहमदाबाद महापालिकेचे विरोधी पक्षनेते होते. बद्रुद्दीन शेख यांच्यावर एसव्हीपी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना एसव्हीपी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यांचा कोरोनाविरोधातील लढा अयशस्वी झाला आणि त्यांचा मृत्यू झाला. शेख यांच्या निधनानंतर देशभरातील काँग्रेस नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. 'गुजरात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अहमदाबाद महापालिकेचे नगरसेवक बद्रुद्दीन शेख यांच्या निधनाचं वृत्त ऐकल्यानंतर दु:ख झालं. या दु:खात काळात त्यांचे कुटुंब आणि नातेवाईंकासोबत माझ्या संवेदना आहेत', असं ट्वीट करत काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे. पश्चिम बंगालमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्याचा मृत्यू पश्चिम बंगालच्या आरोग्य विभागातील एका वरिष्ठ सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्याचा करोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली. 60 वर्षीय डॉ. विल्पव कांती दासगुप्ता, असे मृत डॉक्टरचे नाव असून, ते आरोग्यसेवेत सहाय्यक संचालक होते. त्यांना बेलियाघाट साथरोग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर 18 एप्रिल रोजी सॉल्ट लेक या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Gujrat

    पुढील बातम्या