Home /News /national /

सकाळी सकाळी मोठी दुर्घटना; गॅस लीक झाल्यानं 6 लोकांचा मृत्यू, 20 जणांची प्रकृती गंभीर

सकाळी सकाळी मोठी दुर्घटना; गॅस लीक झाल्यानं 6 लोकांचा मृत्यू, 20 जणांची प्रकृती गंभीर

एका मोठ्या अपघाताची बातमी (Major Accident) समोर आली आहे.

    गुजरात, 06 जानेवारी: गुजरातमधील (Gujarat) सूरतमधून (Surat) एका मोठ्या अपघाताची बातमी (Major Accident) समोर आली आहे. शहरातील सचिन भागात केमिकलने भरलेल्या टँकरमधून केमिकल लीक (Chemical Leakage) झाल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 20 हून अधिक मजुरांचा श्वास गुदमरल्यानं त्यांना सुरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना सचिन परिसरातील GIDC ची आहे. या परिसरात अनेक रासायनिक कारखाने आहेत. येथे टँकरमध्ये रसायनाची गळती झाली. त्यानंतर तेथे काम करणाऱ्या मजुरांचा विषारी वायूमुळे श्वास गुदमरला. हा वायू इतका विषारी होता की 6 जणांना जीव गमवावा लागला. यासोबतच अनेक मजुरांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जीआयडीसीतील राजकमल चिकडी प्लॉट क्रमांक 362 च्या बाहेर 10 मीटर अंतरावर उभ्या असलेल्या केमिकलच्या टँकरपासून 10 मीटर अंतरावर मजूर झोपले होते.  या घटनेत जखमी झालेल्या 20 हून अधिक जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. टँकरमधून रसायन टाकले जात असताना हा अपघात झाल्याचे वृत्त आहे. सध्या 8 जण व्हेंटिलेटरवर आहेत. एक टँकर चालक नाल्यात विषारी रसायन टाकत होता. यादरम्यान त्यातून विषारी वायूची गळती सुरू झाली. वायू हवेच्या संपर्कात आला. पोलीस घटनास्थळी या प्रकरणाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. अपघाताचे वृत्त समजताच आजूबाजूच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Gujrat

    पुढील बातम्या