मराठी बातम्या /बातम्या /देश /

रोहित शेट्टीच्या सिनेमातील स्टंट प्रत्यक्षात घडला, अंगावर काटा आणणारा अपघाताचा CCTV VIDEO

रोहित शेट्टीच्या सिनेमातील स्टंट प्रत्यक्षात घडला, अंगावर काटा आणणारा अपघाताचा CCTV VIDEO

भरधाव कारचा भीषण अपघात, दैव बलवत्तर म्हणून कार चालक भीषण अपघातातून वाचला

भरधाव कारचा भीषण अपघात, दैव बलवत्तर म्हणून कार चालक भीषण अपघातातून वाचला

भरधाव कारचा भीषण अपघात, दैव बलवत्तर म्हणून कार चालक भीषण अपघातातून वाचला

  • Published by:  Akshay Shitole

अहमदाबाद, 31 जानेवारी: अहमदाबाद इथे भरधाव कारचा भीषण अपघात झाला आहे. हा अपघात रस्त्याच्या कडेला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. दैव बलवत्तर म्हणून कार चालक या अपघातातून बचावला आहे. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. अंगावर काटा आणणारा हा भयंकर अपघात आहे.

ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या सिनेमातील कारचा स्टंट पाहावा अगदी तसाच स्टंट प्रत्यक्षात भरदिवसा रस्त्यावर घडली आहे. रस्त्यावर भरधाव कार अडवी होऊन डिव्हायडरवर आदळून हवेत गरगर उडाली आणि खाली आदळली. जसा एखाद्या सिनेमात कारचा स्टंट पाहायला मिळतो तसाच अपघात प्रत्यक्षात घडला आहे.रस्त्यावरून भरधाव कार येत असतानाच अचानक ती स्टंट केल्यासारखी हवेत उडाली. कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकावर आदळली आणि गरगर फिरून हवेत उडाली. त्यानंतर कार दुभाजकावर आदळली. अंगावर काटा आणणारा हा भीषण अपघात आहे. दरम्यान या मोठ्या दुर्घटनेतून कार चालक सुदैवानं बजावला आहे. कार उलटी झाल्यानंतर कार चालकानं कारचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला आणि तो कार दुर्घटनास्थळी सोडून पसार झाला. दुर्घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. दरम्यान फरार कार चालकाचा सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

हेही वाचा-महाराष्ट्र सुन्न करणारी घटना; जालन्यातील प्रेमी युगूलाला बेदम मारहाण

हेही वाचा-देवदर्शन करून येत असतानाच काळाचा घाला, भीषण अपघातात 4 जणांचा मृत्यू

हेही वाचा-पंढरपूरमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळीचा धुमाकूळ, धडकी भरवणारं दृष्य CCTVमध्ये कैद

First published:

Tags: Car accident, Gujrat