CCTV VIDEO : पोलवर आदळलेल्या गाडीने अचानक घेतला पेट, असा वाचला तरुणाचा जीव

CCTV VIDEO : पोलवर आदळलेल्या गाडीने अचानक घेतला पेट, असा वाचला तरुणाचा जीव

डोळ्यासमोर एकादी दुर्घटना घडली की काळजाचा जसा ठोका चुकतो तसा अगदी थोडक्यात जीव वाचल्यानंतर होतं.

  • Share this:

सूरत, 01 फेब्रुवारी: डोळ्यासमोर एकादी दुर्घटना घडली की काळजाचा जसा ठोका चुकतो तसा अगदी थोडक्यात जीव वाचल्यानंतर होतं. एका तरुणाच्या डोळ्यासमोर कारनं अचानक पेट घेतला आणि दुर्घटना घडली मात्र हा तरुण अगदी एका सेकंदासाठी या अपघातातून वाचला. ही दुर्घटना घडली आहे गुजरात इथल्या सूरतमध्ये. कारचालकाचं नियंत्रण सुटल्यानं रस्ता सोडून कार पार्क केलेल्या दुचाकींसह पोलवर धडकली आणि गाडीच्या बोनेटला आग लागली. शेजारून चालत जाणारा युवक या दुर्घटनेत अगदी फ्रॅक्शन ऑफ सेकंदाच्या फरकानं वाचला नाहीतर मोठा अनर्थ घडला असता.

एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार ही घटना सुरतची आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या व्हिडिओमध्ये कार चालकाचं नियंत्रण सुटल्याचं स्पष्ट दिसत आहे. नियंत्रण सुटल्यामुळे कार पोलवर आदळली आणि जवळूनच चालत असलेल्या एका प्रवाशाच्या अंगावर येणार तोच प्रवासी लांब पळाला. त्यामुळे प्रवाशाचा जीव वाचला आणि बघता क्षणी गाडीच्या बोनेटनं पेट घेतला. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांच्या मदतीनं कारमधील प्रवाशांना बाहेर काढलं आहे. हे प्रवासी कुठे होते आणि कार चालकाचं नियंत्रण कशामुळे सुटलं याबाबत कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र हा भीषण अपघाताचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हेही वाचा-VIDEO : बाबा, बायकांवर लय पैसा उडतो! मुलाला झालीय Valentines dayची अॅलर्जी

हेही वाचा-VIDEO : मुलीला बॅकसीटवर बसवून तरुणाची हिरोगिरी, बसला ओव्हरटेक करायला गेला आणि...

First published: February 1, 2020, 12:08 PM IST

ताज्या बातम्या