...आणि पुराच्या पाण्यात पत्त्यांसारखी कोसळली इमारत, पाहा दुर्घटनेचा LIVE VIDEO

...आणि पुराच्या पाण्यात पत्त्यांसारखी कोसळली इमारत, पाहा दुर्घटनेचा LIVE VIDEO

नर्मदा नदीनं रौद्र रुप धारण केल्यानं अनेक गावांना त्याचा मोठा फटका बसला आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 01 सप्टेंबर : महाराष्ट्रसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला आहे. गुजरातच्या निर्मदा नदीनं धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे अनेक ठिकाणी पूर आला आहे. गुजरातमधील अनेक गावांमध्ये पाणी शिरलं आहे. याच दरम्यान नर्मदा नदीजवळ असलेल्या एका परिसरात व्हिडीओ समोर आला आहे.

नर्मदा नदीनं रौद्र रुप धारण केल्यामुळे अनेक ठिकाणी भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. मध्य गुजरातमधील भरूज जिल्ह्यात नर्मदेजवळ प्राचिन मंदिराचा भाग असलेली इमारत पुराच्या पाण्यात पत्त्यासारखी कोसळली आहे. ही घटना स्थानिकांच्या कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हे वाचा-रस्ते इतके खराब की मृतदेहाला खांदाही देता येत नाही, आधुनिक भारताला लाजवणारे फोटो

नर्मदा नदीनं रौद्र रुप धारण केल्यानं अनेक गावांना त्याचा मोठा फटका बसला आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातही विदर्भातील अनेक गावांमध्ये मुसळधार पाऊस आणि धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक पिकं पाण्याखाली गेल्यानं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: September 1, 2020, 3:02 PM IST

ताज्या बातम्या