Home /News /national /

Congress च्या बड्या नेत्याची मोठी घोषणा, राजकारणातून घेतला Break

Congress च्या बड्या नेत्याची मोठी घोषणा, राजकारणातून घेतला Break

मला हायकमांडकडून कोणतीही सूचना मिळाली नसल्याचा दावा सोलंकी यांनी केला आहे. त्याचबरोबर आता दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि इतर मागासलेल्या समाजातील लोकांना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

    अहमदाबाद, 04 जून: गुजरात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष (Former Gujarat Congress state president) आणि माजी केंद्रीय मंत्री भरतसिंह सोलंकी (Former Union Minister Bharatsinh Solanki) यांनी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यानंतर राजकारणातून ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. या काळात काही महिने राजकारणापासून दूर राहणे हा त्यांचा स्वतःचा निर्णय असल्याचे काँग्रेस नेते सोलंकी यांनी सांगितले. त्याचबरोबर आता दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि इतर मागासलेल्या समाजातील लोकांना भेटणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. मी काही महिन्यांसाठी सक्रिय राजकारणातून ब्रेक घेऊन सामाजिक उपक्रमांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे, असं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. तसंच या काळात मी दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि इतर मागासलेल्या समाजातील लोकांना भेटण्यासाठी अधिक वेळ देईन, असंही त्यांनी म्हटलं. पक्षाच्या सूचनेनंतर सोलंकी यांनी हा निर्णय घेतल्याची शक्यता वर्तवली जात आहे. Big News: विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह मात्र मला हायकमांडकडून कोणतीही सूचना मिळाली नसल्याचा दावा सोलंकी यांनी केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत असा दावा केला जात आहे की, सोलंकी यांच्या पहिल्या पत्नीनं त्यांना दुसऱ्या महिलेसोबत रंगेहात पकडलं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रेश्मा पटेलला बातमी मिळाली होती की तिचा पती भरतसिंह सोलंकी एका महिलेसोबत एका खोलीत बंद आहे. दरम्यान रेश्मा पटेल काही लोकांसह तेथे पोहोचली आणि सोलंकी सिंगला रंगेहाथ पकडले. भरतसिंह सोलंकी आणि त्यांची पत्नी रेश्मा यांच्यात कायदेशीर लढाईही सुरू आहे. पूर्व प्रदेश अध्यक्ष भरत सिंह सोलंकी ने सक्रिय राजनीति से कुछ वक्त के लिए ब्रेक ले लिया है. (फोटो- ट्विटर) एका पत्रकार परिषदेत सोलंकी यांनी सांगितलं की, त्यांनी घटस्फोटासाठी आधीच अर्ज दाखल केला आहे आणि आरोप केला आहे की त्यांच्या पत्नीला त्यांच्या मालमत्तेत रस आहे आणि त्यांच्या जीवाला धोका आहे, असे NDTV ने वृत्त दिले आहे. काँग्रेस नेते म्हणाले की, आम्ही अनेक वर्षांपासून एकत्र राहिलो नाही. मी घटस्फोटाची मागणी करत आहे कारण तिनं माझी संपत्ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला होता. जर मी तिला घटस्फोट दिला तर मी पुन्हा लग्न करू शकतो, कोर्ट माझ्या घटस्फोटाच्या अर्जावर 15 जूनला सुनावणी करणार आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Gujrat

    पुढील बातम्या