14 डिसेंबर : कोणत्याही निवडणुकीत मतदाराचा कौल तर असतोच पण त्याही पेक्षा मतदान किती होतं यावर बरीच गणितं अवलंबून असतात. गुजरात निवडणुकीत दोन्ही टप्प्यात झालेल्या मतदान पाहता मागील निवडणुकीच्या तुलनेत 3 टक्क्याने कमी झालंय. त्यामुळे भाजपसाठी हा आशादायक आकडा ठरणार अशी शक्यता आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत दुसऱ्या टप्प्यात मतदान संपलं. दुसऱ्या टप्प्यात 14 जिल्ह्यात 93 जागेसाठी 69 टक्के मतदान झालं. तर 9 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात 19 जिल्ह्यात 89 जागांसाठी 66.75 टक्के मतदान झालंय. दोन्ही टप्प्यातील मतदान मिळून राज्यात 67.72 टक्के मतदान झालंय.
मागील निवडणुकीत 71 टक्के मतदान झालं होतं. त्यामुळे यावेळी जवळपास तीन टक्के मतदान कमी झालंय. ज्यावेळी मतदान जास्त होतं तेव्हा मतदानाची टक्केवारी ही सत्ताधाऱ्यांना डोकेदुखी ठरणार असते. पण, गुजरातमध्ये उलट तीन टक्के मतदान कमी झालंय. त्यामुळे आता 18 तारखेला मतदारराजा कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकलंय कुणाचा विजय होणार हे तेव्हाच कळणार.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा