मराठी बातम्या /बातम्या /देश /

Gujarat Election Results : सुरूवातीला पिछाडीवर गेलेल्या जडेजाच्या पत्नीचं काय झालं? पाहा जामनगरचा निकाल

Gujarat Election Results : सुरूवातीला पिछाडीवर गेलेल्या जडेजाच्या पत्नीचं काय झालं? पाहा जामनगरचा निकाल

गुजरात विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपने 182 जागांपैकी 156 जागांवर विजय मिळवत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपने 182 जागांपैकी 156 जागांवर विजय मिळवत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपने 182 जागांपैकी 156 जागांवर विजय मिळवत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jamnagar, India
  • Published by:  Shreyas

जामनगर, 8 डिसेंबर : गुजरात विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपने 182 जागांपैकी 156 जागांवर विजय मिळवत रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. गुजरात राज्याच्या स्थापनेपासून कोणत्याच पक्षाला एवढ्या जागांवर विजय मिळवता आला नव्हता. याआधी 1980 साली काँग्रेसने माधवसिंग सोळंकी यांच्या नेतृत्वात 183 पैकी 149 जागा जिंकल्या होत्या.

गुजरात विधानसभा निवडणुकीत जामनगर उत्तर मतदारसंघातून क्रिकेटपटू रवींद्र जडेजा याची पत्नी रिवाबा जडेजा रिंगणात उतरली होती. या लढतीमध्ये रिवाबा जडेजाने आपचे उमेदवार कर्षनभाई कर्मूर यांचा पराभव केला. सुरूवातीच्या काही राऊंडमध्ये रिवाबा जडेजा पिछाडीवर होत्या, त्यामुळे जामनगरमध्ये धक्कादायक निकाल लागणार का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या, पण नंतरच्या राऊंडमध्ये रिवाबा जडेजाने आघाडी घेतली.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार रिवाबा जडेजाला 77,630 मतं मिळाली, तर कर्षनभाई कर्मूर 31,671 मतांसह दुसऱ्या क्रमांकावर राहिले. काँग्रेसच्या बिपेंद्रसिंग जडेजा यांना 22,180 मतं मिळाली.

जामनगर उत्तर मतदारसंघाची निवडणूक रोमांचक झाली होती, कारण रवींद्र जडेजाने पत्नीसाठी प्रचार केला, तर रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा जडेजाने त्यांच्या वडिलांनी काँग्रेससाठी प्रचार केला होता. यानंतर जडेजा कुटुंबातले मतभेदही चव्हाट्यावर आले होते.

जामनगर उत्तर हा मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला राहिला आहे. 2017 साली भाजपचे धर्मेंद्रसिंग जडेजा आमदार झाले होते, पण यावेळी पक्षाने रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबाला संधी दिली.

रिवाबा जडेजा या मेकॅनिकल इंजिनिअर आहेत, 2016 साली त्यांचं रविंद्र जडेजासोबत लग्न झालं. 2019 लोकसभा निवडणुकीआधी रिवाबा जडेजा भाजपमध्ये आल्या आणि राजकारणात सक्रीय झाल्या. तीन वर्षांनंतर भाजपने जामनगरमधून रिवाबा जडेजाना संधी दिली.

रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा जडेजाने निवडणूक प्रचारादरम्यान रिवाबावर अनेक आरोप केले होते. रिवाबाने निवडणूक प्रचारात मुलांचा वापर केला, ही बालमजुरी आहे, तसंच रिवाबा सहानुभूती घेण्यासाठी मुलांचा वापर करत आहे, असा आरोप नयनाबा जडेजाने केला. यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगात तक्रारही दाखल केली.

'रिवाबाचं अधिकृत नाव रीवा सिंह हरदेव सिंह सोळंकी आहे, पण जडेजा नावाचा वापर करण्यासाठी तिने कंसात रवींद्र जडेजा नाव लिहिलं आहे. लग्नाच्या सहा महिन्यानंतरही रिवाबाला नाव बदलण्यासाठी वेळ मिळाला नाही,' अशी टीकाही नयनाबा जडेजाने केली होती.

First published:

Tags: BJP, Ravindra jadeja