हा निकाल ईव्हीएमचा, जनतेचा नाही - संजय निरुपम

काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. गुजरातमध्ये भाजपचा विजय हा ईव्हीएमचा असून जनतेचा नाही अशी टीका निरुपम यांनी केलीये.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Dec 18, 2017 02:33 PM IST

हा निकाल ईव्हीएमचा, जनतेचा नाही - संजय निरुपम

18 डिसेंबर : गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निकालानंतर काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी भाजपवर हल्लाबोल केलाय. गुजरातमध्ये भाजपचा विजय हा ईव्हीएमचा असून जनतेचा नाही अशी टीका निरुपम यांनी केलीये.

गुजरात आणि हिमाचलच्या निकालावर बोलताना निरुपम म्हणाले की, 'जेव्हा सगळं गुजरात भाजपच्या विरोधात होतं, पंतप्रधानांच्या सभेतील सगळ्या खुर्च्या रिकाम्या होत्या, त्यामुळे भाजपचा हा विजय जनतेमुळे नाही तर ईव्हीएममुळे झाला आहे.'

काँग्रेसने वारंवार ईव्हीएमच्या घोळावर प्रश्न उपस्थितीत केले होते. पण निवडणूक आयोगाने असा दावा केला की, ईव्हीएममध्ये कोणताही घोळ होऊ शकणार नाही.

ईव्हीएम ही कॅम्प्युटराईज मशिन नाही आहे ती एक स्वतंत्र्य मशिन आहे. ती इंटरनेट किंवा इतर कोणत्याही नेटवर्कशी कनेक्ट होत नाही. त्यामुळे त्याला कोणीही हॅक करु शकत नाही असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलंय.

पण 'पंजाब निवडणुकीतल्या ईव्हीएमवर काँग्रेस का नाही बोलत?' असा उलटा सवाल भाजपने उपस्थित केलाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 18, 2017 02:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...