गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात 68.70 टक्के मतदान

गुजरातमध्ये दुसऱ्या टप्प्यात 68.70 टक्के मतदान

गुजरातमध्ये विधानसभेच्या ९३ जागांसाठी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान शांततेत पार पडलं.

  • Share this:

 14 डिसेंबर: गुजरातमध्ये विधानसभेच्या ९३ जागांसाठी दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचं मतदान शांततेत पार पडलं. दुसऱ्या टप्प्यात 68.70 टक्के मतदान  झालंय.

गुजरात विधानसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात 68 टक्के मतदान पार पडल्यानंतर आज दुसऱ्या टप्प्यातील मतदानही शांततेत पार पडलं. दुसऱ्या टप्प्यात  ९३ जागांसाठी ८५१ उमेदवार रिंगणात आहे. एकूण २५ हजार ५५८ मतदान केंद्रावर मतदान झालं. आज सकाळपासून मतदानासाठी मोठा उत्साह पाहण्यास मिळाला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साबरमती विधानसभा मतदारसंघातील रानिप येथील निशान हायस्कूलमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मोदींनी सर्वसामान्यांप्रमाणे रांगेत उभं राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. मतदान करून बाहेर आल्यावर नरेंद्र मोदी यांनी आपलं सुरक्षा कवच बाजूला सारून लोकांमध्ये मिसळलेले पहायला मिळाले. यावेळेस त्यांनी लोकांना मतदान करण्याचं आवाहनही केलं. दरम्यान, लोकांच्या गर्दीमुळे पंतप्रधान मोदींच्या सुरक्षारक्षकांचा चांगलाच गोंधळ उडाला होता. पण पंतप्रधानांना रानिपमध्ये आलेलं पाहून लोकांमध्ये उत्साह पहायला मिळाला.

तर दुसरीकडे सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आई हीराबेन मोदी यांनीही मतदानाचा हक्क बजावला. हीराबेन गांधीनगरमध्ये राहतात. तिथल्या एका मतदान केंद्रावर त्यांनी आपला हक्क बजावला..

भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी सपत्नीक मतदान केलं. अहमदाबादच्या नारणपुरा भागात शहा राहतात. तिथल्या एका मतदान केंद्रावर त्यांनी आपला हक्क बजावला. लालकृष्ण अडवाणी आणि अरुण जेटलीही आज मतदान करणार आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी अहमदाबादमध्ये आपला मतदानाचा हक्क बजावला. अरुण जेटली गुजरातमधून राज्यसभेवर गेल्यामुळे त्यांचं गुजरातच्या मतदार यादीमध्ये नाव आहे.

तर पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल आणि काँग्रेसचे नेते अल्पेश ठाकूर यांनीही मतदानाचा हक्क बजावला. अहमदाबाद जिल्ह्यातल्या विरामगाम मतदारसंघातल्या मतदान केंद्रावर हार्दिकनी मतदान केलं.

आता 18 तारखेला सोमवारी मतमोजणी होणार आहे त्यामुळे गुजरातकरांचा कौल कुणाला हे पाहण्याचं ठरणार आहे.

First published: December 14, 2017, 5:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading