Elec-widget

...आणि राहुल गांधींच्या सभेत अवतरले 'मोदी' !

...आणि राहुल गांधींच्या सभेत अवतरले 'मोदी' !

"माझ्या समाजात अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी मी राहुल गांधींची भेट घेण्यासाठी इथं आलो"

  • Share this:

24 नोव्हेंबर : काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या सभेत व्यासपीठावर मोदी अवतरले...दचकू नका !, राहुल गांधींच्या सभेत खरोखरचं मोदी अवतरले पण त्यांचं नाव आहे भरत मोदी...

गुजरात विधानसभा निवडणुकीचा आखाडा आता चांगलाच तापलाय. आजपासून दोन दिवस राहुल गांधी गुजरातच्या दौऱ्यावर आहे. पोरबंदर इथं त्यांची जाहीर सभा पार पडली. राहुल गांधी जेव्हा सभेच्या व्यासपीठावर पोहोचले तेव्हा भाजपचे एक नेते राहुल गांधींच्या भेटीसाठी व्यासपीठावर दाखल झाले होते.

भरत मोदी असं या नेत्याचं नाव आहे. भरत मोदी हे पोरबंदर नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहे. भरत मोदी यांनी व्यासपीठावर जाऊन "मी भाजपचा कार्यकर्ता आहे, आणि भाजपसोबतच राहणार आहे" अशी घोषणाच केली. तसंच "माझ्या समाजात अनेक समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी मी राहुल गांधींची भेट घेण्यासाठी इथं आलो असा खुलासाही भरत मोदींनी केला.

'नोटबंदीचा फायदा सूट-बूटवाल्यांनाच'

या सभेत राहुल गांधींनी नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्यावरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नोटबंदीचा फायदा फक्त सूट-बूटवाल्यांचा फायदा झाला. नोटबंदीच्या काळात प्रत्येक बँकेबाहेर सर्वसामान्य लोकं रांगेत उभे होते. पण या रांगेत कोणत्याही सूट-बूटवाल्यांना पाहिलं नाही. कारण ही मंडळी बँकेत मागच्या दाराने घुसली होती अशी टीका राहुल गांधींनी केली.

Loading...

जीएसटी ही घाईघाईत लागू करण्यात आली. त्यामुळे छोट्या व्यापारांना याचा मोठा फटका बसलाय. जीएसटी आणि नोटबंदीमुळे लोकं त्रस्त आहे. पण याचा मोदींवर कोणताही परिणाम होत नाहीये आणि त्यांना याबद्दल काही घेणं देणंही नाही असंही राहुल गांधी म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 24, 2017 07:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...