रुग्णाला वाटलं आता सगळं संपलं, पाण्यात अडकलेल्या Ambulanceचा थरार...पाहा VIDEO

रुग्णाला वाटलं आता सगळं संपलं, पाण्यात अडकलेल्या Ambulanceचा थरार...पाहा VIDEO

गाडी सुरुच होत नसल्याने सगळेच घाबरले होते. पाणी जास्त असल्याने रुग्णांना बाहेरही पडता येत नव्हतं.

  • Share this:

राजकोट 13 ऑगस्ट: गुजरातमधल्या राजकोट शहरात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस होत आहे. बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं आहे. राजकोटमध्ये सखल भागत असलेल्या एका पुलाखाली मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं होतं. त्यात आज एक Ambulance अडकली आणि आतमध्ये असलेल्या रुग्णाचा जीव टांगणीला लागला होता. मात्र नंतर बचाव पथकाने दोरीच्या साह्याने Ambulanceला बाहेर काढण्यात यश मिळवलं. मात्र तोपर्यंत हॉस्पिटलमध्ये जाण्याआधीच सगळं संपणार का? या भीतीनेच रुग्णाच्या पोटात गोळा उठला होता.

रुग्णाला घेऊन ही Ambulance हॉस्पिटलकडे निघाली होती. पुलाखाली जास्त पाणी साचलेलं होतं. मात्र ड्रायव्हरला त्या पाण्याचा अंदाजच आला नाही. त्यामुळे त्याने गाडी पाण्यात टाकली. मात्र पाणी जास्त असल्याने ती मध्येच ती बंद पडली.

गाडी सुरुच होत नसल्याने सगळेच घाबरले होते. पाणी जास्त असल्याने रुग्णांना बाहेरही पडता येत नव्हतं. शेवटी स्थानिक लोक आणि प्रशासनाने मोठी दोरी बांधून सगळ्या माणसांनी ती Ambulance मागे ओढली आणि 30 मिनिटानंतर पाण्याबाहेर आणण्यात त्यांना यश मिळालं.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 13, 2020, 6:56 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading