नाराज तोगडियांचं थेट 'संघा'लाच आव्हान!

नाराज तोगडियांचं थेट 'संघा'लाच आव्हान!

विश्व हिंदू परिषदेतून उचलबांगडी झालेले प्रविण तोगडिया यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आव्हान दिलंय. राम मंदिराची उभारणी आणि इतर प्रश्नांसाठी तोगडीयांनी अहमदाबादमध्ये उपोषण सुरू केलंय.

  • Share this:

अहमदाबाद,ता.17एप्रिल: विश्व हिंदू परिषदेतून उचलबांगडी झालेले प्रविण तोगडिया यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आव्हान दिलंय. राम मंदिराची उभारणी आणि इतर प्रश्नांसाठी तोगडीयांनी अहमदाबादमध्ये उपोषण सुरू केलंय.

तोडियांनी उपोषण करू नये म्हणून गुजरातमधल्या संघाच्या तीन ज्येष्ठ नेत्यांनी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते बधले नाहीत. 'हिंदू ही आगे' या नावाची नवी संघटना ते काढण्याची शक्यता आहे.

वाचाळपणा आणि स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचल्यानंतर संघानं त्यांची उचलबांगडी करण्याची योजना आखली होती. आणि अध्यक्षपदासाठी निवडणूक घेऊन त्यात विष्णु कोकजे यांची विश्व हिंदू परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यानंतर तोगडिया नाराज असून पंतप्रधान नरेंद्र मोदींना ते टार्गेट करण्याची शक्यता आहे.

 

 

First published: April 17, 2018, 5:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading