नवरात्राच्या पहिल्याच दिवशी 21 भाविकांवर काळाचा घाला; देवीचं दर्शन घेऊन परतताना झाला अपघात

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी अंबाजी मंदिरातून देवीचं दर्शन घेऊन परत येत असताना भाविकांची बस दरीत कोसळली. या अपघातात 21 जण मृत्युमुखी पडले तर किमान 10 जण गंभीर जखमी झाल्याची शक्यता आहे.

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 09:01 PM IST

नवरात्राच्या पहिल्याच दिवशी 21 भाविकांवर काळाचा घाला; देवीचं दर्शन घेऊन परतताना झाला अपघात

पालनपूर (गुजरात), 30 सप्टेंबर : नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी अंबाजी मंदिरातून देवीचं दर्शन घेऊन परत येत असताना भाविकांची बस दरीत कोसळली. या अपघातात 21 जण मृत्युमुखी पडले तर किमान 10 जण गंभीर जखमी झाल्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये बनासकांठा जिल्ह्यात हा अपघात झाला. या भागातलं अंबाजी मंदिर प्रसिद्ध आहे. या देवीच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात.

या अपघातात दगावलेले बहुतेक लोक नाडियाद, आणंद आणि बोरसाद या ठिकाणचे राहणारे आहेत. जी बस दरीत कोसळळी त्यामध्ये 65 प्रवासी होते. त्रिशुलिया घाटात ही दुर्घटना घडली. घाटातल्या रस्त्यात चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस दरीत कोसळली.

हे वाचा - भारताच्या अर्थव्यवस्थेला आणखी एक धक्का, 8 क्षेत्रांतल्या उद्योगांची मोठी घसरण

स्थानिकांच्या मदतीने जखमींना जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं. दरीतून मृतदेह काढणं बिकट होतं कारण बस खोल दरीत पडली होती.

बनासकांठाच्या या भीषण अपघाताची बातमी येताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून शोक व्यक्त केला.

स्थानिकांच्या सांगण्यानुसार, संध्याकाळी 4 च्या सुमारास हा अपघात झाला.

हेही वाचा - उपमुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं का? चंद्रकांत पाटील यांनी दिलं हे उत्तर!

बस दरीत कोसळली आणि अपघाताची भीषणता लक्षात येताच गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी जिल्हाधिकाऱ्यांची तातडीने संपर्क साधून गरज असेल ती मदत देऊ केली आहे. गुजरातमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे मदतकार्यात अडचणी येत आहेत.

------------------------------------------

VIDEO : घरासमोर लिंबू-मिरची टाकली, वृद्ध महिलेला चौघांकडून जबर मारहाण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 09:01 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...