ट्रक-रिक्षाच्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू, रस्त्यावरच पडून होते प्रवाशांचे मृतदेह

ट्रक-रिक्षाच्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू, रस्त्यावरच पडून होते प्रवाशांचे मृतदेह

ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 15 जुलै : ट्रक आणि रिक्षाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. यामध्ये 7 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. गुजरातमधील कच्छ परिसरातील मनकुवा येथील ही दुर्घटना आहे. सोमवारी (15 जुलै)हा अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरून घेऊन जाणाऱ्या रिक्षा आणि भरधाव ट्रकची जोरदार टक्कर झाली. हा अपघात इतका भीषण होता की रिक्षेचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. यानंतर स्थानिकांनी जखमींना तातडीनं हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

Loading...

(पाहा : सेल्फी घेण्याच्या नादात मरता-मरता वाचला युवक, पाहा रेस्क्यू ऑपरेशनचा VIDEO)

राइड कोसळून 2 जणांचा मृत्यू, 25 जखमी

दरम्यान, रविवारी देखील अहमदाबाद येथे भीषण दुर्घटना घडली होती.  येथील एका अॅडव्हेंचर पार्कमधील राइड अचानक कोसळली. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता तर 25 हून अधिक जण जखमी झाले. कांकरिया अॅडव्हेंचर पार्कमध्ये ही घटना घडली.

(पाहा :VIDEO: औरंगाबादमध्ये खळबळ, पायात साखळी कुलूप बांधून फिरतेय महिला)

अ‍ॅडव्हेंचर पार्कमधील राइड अचानक कोसळली, दुर्घटनेचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 15, 2019 04:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...