Home /News /national /

मुसळधार पावसानंतर थेट रस्त्यावरच आली 5 फुटांची मगर, नंतर काय झालं पाहा VIDEO

मुसळधार पावसानंतर थेट रस्त्यावरच आली 5 फुटांची मगर, नंतर काय झालं पाहा VIDEO

ही मगर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बेंच खाली लपून बसली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

    बडोदा 16 ऑगस्ट: देशातल्या अनेक भागात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. गुजरातमधही दमदार पाऊस सुरु असून बडोद्याच्या विश्वामित्री नदीला पूर आलाय. या पूरातून ए मगर चक्क रस्त्यावर आल्याने एकच खळबळ उडाली. त्या मगरीचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. रस्त्यावर गर्दी नसल्याने ही मगर एका बेंच खाली दडून बसली होती. काही लोकांन ती दिसल्याने नंतर तिला पकडून पुन्हा नदीमध्ये सोडण्यात आलं आहे. गेल्या काही दिवसांपासून बडोद्यात संततधार सुरु आहे. त्यामुळे इथल्या विश्वामित्री नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्यातून एक 5 फुटांची मोठी मगर चक्क रस्त्यावर वाहून आली. नदी काठच्या भागात असलेल्या कला भवन या भागात ही मगर आली होती. त्यामुळे एकच खळबळ उडाली. ही मगर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका बेंच खाली लपून बसली होती. रस्त्यावरून जाणाऱ्या काही माणसांना ही मगर दिसताच ते चांगलेच घाबरले. नंतर ही माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली होती. त्यानंतर Gujarat Society for Prevention of Cruelty to Animals (GSPCA) या संघटनेला ही माहिती देण्यात आली. संघटनेच्या लोकांनी नंतर शिताफीने त्या मगरीला पकडलं आणि तिला पुन्हा नदीच्या खोल पाण्यात सोडूत दिलं. हा भाग हा रहिवासी भाग असल्याने इथल्या सोसायट्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. मात्र या घाबरण्यासारखं काहीही नाही पूरामुळे ही मगर रस्त्याव आली असल्याच प्राणीमित्र संघटनेनं सांगितलं.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या