राजीव गांधी हत्याकांड : 28 वर्षांनंतर पहिल्यांदाच दोषी नलिनी आली कारागृहाबाहेर

राजीव गांधी हत्याकांड : 28 वर्षांनंतर पहिल्यांदाच दोषी नलिनी आली कारागृहाबाहेर

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांड प्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरन कारागृहातून बाहेर आली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 जुलै : माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याकांड प्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरन 28 वर्षांत पहिल्यांदाच कारागृहातून बाहेर आली आहे. मद्रास हायकोर्टानं तिला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे. मुलीच्या विवाह सोहळ्याची तयारी करण्यासाठी नलिनीनं हायकोर्टाकडे 6 महिन्यांच्या पॅरोल देण्यासाठी अर्ज केला होता. मिळालेल्या माहितीनुसार, 5 जुलै रोजी मद्रास हायकोर्टानं तिला 30 दिवसांचा पॅरोल मंजूर केला आहे.

कोण आहे नलिनी श्रीहरन?

नलिनीनं चेन्नईच्या एक कॉलेजमधून आपलं पदवी शिक्षण पूर्ण केलं होतं. यानंतर चेन्नईमध्येच एका खासगी कंपनी ती स्टेनोग्राफर म्हणून कार्यरत होती. सोबतच ती पुढील शिक्षणदेखील घेत होती. यादरम्यानच, 21 मे 1991 रोजी लिट्टे संघटनेनं तामिळनाडूच्या श्रीपेरंबदुर येथे आत्मघातकी हल्ला घडवून राजीव गांधी यांची हत्या केली. या हल्ल्यात एकूण 18 जणांचा बळी गेला होता. या प्रकरणात नलिनी दोषी आढळून आली.

(वाचा : शरद पवार संतापले, 'त्या' अफवा फेटाळण्यासाठी लिहिली फेसबुक पोस्ट)

राजीव गांधी हत्या प्रकरणात नलिनी दोषी

नलिनी लिट्टे संघटनेच्या (Liberation Tigers of Tamil Eelam)एका कार्यकर्त्याच्या संपर्कात आली आणि यादरम्यानच ती संघटनेच्या विविध कारवायांसोबत तिचा परिचय झाला, अशी माहिती या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान समोर आली. यानंतर ती संघटनेची सक्रिय कार्यकर्ता म्हणून समोर आली. तिचा भाऊ पीएस भाग्यनाथनदेखील लिट्टेचा समर्थक होता.

(वाचा : सचिन अहिरांच्या हाती शिवबंधन, मुंबईत राष्ट्रवादीला धक्का)

माफीची शिक्षा झाली माफ?

अटकेच्या कारवाईनंतर नलिनीनं एका मुलीला जन्म दिला. यामुळे तिची फाशीची शिक्षा न्यायालयानं माफ केली. न्यायालयानुसार,'मुरुगन आणि नलिनी दोघांनाही फाशी शिक्षा दिल्यास त्यांचं बाळ अनाथ झालं असतं'. यानंतर काही दिवसांनी सोनिया गांधी यांनी स्वतः राष्ट्रपतींची भेट घेऊन नलिनीला माफ करण्याची विनंती केली. सोनियांच्या विनंतीनुसार 2000 साली राष्ट्रपतींनी नलिनीची दया याचिका मंजुरी केली आणि तिला शिक्षेत माफी दिली.

(वाचा :'पवारसाहेब कायम माझ्या ह्रदयात राहतील', शिवसेना प्रवेशापूर्वी अहिरांचे उद्गार)

दरम्यान, या हत्याकांड प्रकरणातील दोषी आजही तामिळनाडूच्या कारागृहात शिक्षा भोगत आहेत. पण राजीव गांधींच्या मारेकऱ्यांची सुटका करण्याची मागणी वारंवार केली जाते. दुसरीकडे राजीव गांधींच्या मारेकऱ्यांना सोनिया गांधी यांच्यासह गांधी-नेहरू परिवारानं माफ केलं आहे.

VIDEO: शिवसेना प्रवेशाची चर्चा छगन भुजबळांनी फेटाळली

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 25, 2019 01:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading