5 ऑगस्टपासून सुरू होणार जिम आणि योगा इन्स्टिट्यूट; काय आहे नवी नियमावली

5 ऑगस्टपासून सुरू होणार जिम आणि योगा इन्स्टिट्यूट; काय आहे नवी नियमावली

योगा आणि जिम सुरू झाल्या असल्या तरी त्यासाठी कडक नियमावली लागू करण्यात आली आहे

  • Share this:

नवी दिल्ली, 3 ऑगस्ट : देशभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. गेल्या 4 महिन्यांपासून सुरू असलेला लॉकडाऊन हळूहळू शिथिल केला जात आहे. यातच 5 ऑगस्टपासून जिम आणि योगा इन्स्टिट्यूट खुली करण्यात येणार आहे. मात्र यासाठी काही नियमावली लागू करण्यात येणार आहे. Ministry of Health and Family Welfare याबाबत नियमावली लागू केली आहे आणि सर्व संस्थांनी त्याचे पालन करणे आवश्यक आहे.

-कंटेन्मेंट झोनमधील जिम आणि योगा इन्स्टिट्यूट खुली राहण्यास परवानगी नाही

-राज्य आणि केंद्र सरकारच्या एसओपीनुसार योगा इन्स्टिट्यूट आणि जिम चालवावे लागणार आहेत.

-65 वर्षांहून अधिक, गर्भवती महिला, वा 10 वर्षांहून कमी मुलांनी जिम वापरू नये. यानुसार संस्थेच्या व्यवस्थापकांनी जिम आणि योगा इन्स्टिट्यूटमध्ये येणाऱ्यांना परवानगी द्यावी.

- प्रत्येक व्यक्तींमध्ये 6 फूट अंतर असावे.

-संस्थेच्या बाहेरील भागात मास्क घालणे अनिवार्य आहे.

-योगा आणि जिममध्ये फिरताना सातत्याने हात धुणं अनिवार्य आहे.

- योगा आणि जिमच्या परिसरात थुंकण्यास सक्त मनाई आहे.

-योगा आणि जिममध्ये येणाऱ्यांनी आरोग्य सेतू अप डाऊनलोड करुन घ्यावे

Published by: Meenal Gangurde
First published: August 3, 2020, 3:36 PM IST

ताज्या बातम्या