मराठी बातम्या /बातम्या /देश /लॉकडाऊनमध्ये करा Amazon-Flipkartवरून शॉपिंग, 'या' तारखेपासून सुरू होऊ शकते सेवा

लॉकडाऊनमध्ये करा Amazon-Flipkartवरून शॉपिंग, 'या' तारखेपासून सुरू होऊ शकते सेवा

सरकारच्या नवीन नियमावलीत ग्राहकांना लवकरच इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या ( Amazon, Flipkart) माध्यमातून ऑनलाईन वस्तुंची खरेदी करता येऊ शकते.

सरकारच्या नवीन नियमावलीत ग्राहकांना लवकरच इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या ( Amazon, Flipkart) माध्यमातून ऑनलाईन वस्तुंची खरेदी करता येऊ शकते.

सरकारच्या नवीन नियमावलीत ग्राहकांना लवकरच इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या ( Amazon, Flipkart) माध्यमातून ऑनलाईन वस्तुंची खरेदी करता येऊ शकते.

नवी दिल्ली, 15 एप्रिल : कोरोनाव्हायरसमुळे केंद्र सरकारमुळे लॉकडाऊनचा कालावधी 3 मेपर्यंत वाढवला आहे. यासाठी सरकारच्या वतीने नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ग्राहकांना लवकरच इ-कॉमर्स प्लॅटफॉर्मच्या ( Amazon, Flipkart) माध्यमातून ऑनलाईन वस्तुंची खरेदी करता येऊ शकते. नवीन नियमावलीमध्ये असे म्हटले आहे की सर्व उपक्रम राज्य / केंद्रशासित प्रदेशांच्या परवानगीनंतर 20 एप्रिलपासून लागू केले जातील.

नवीन नियमावलीत असे सांगितले गेले आहे की, मर्यादित नियंत्रण क्षेत्र, हॉटस्पॉट्स आणि रेड झोन वगळता सर्वत्र मालाची वाहतूक करण्याची परवानगी दिली जाईल. यामध्ये वस्तू आणि पार्सलच्या वाहतुकीसाठी रेल्वेचे कामकाज, वाहतुकीसाठी विमानतळ आणि मालवाहतुकीसाठी लँड बंदरांच्या कामकाजाचा समावेश आहे. त्यामध्ये ट्रक आणि ई-कॉमर्स वाहनांचाही समावेश आहे.या नियमावलीत अत्यावश्यक वस्तू घेऊन येणार्‍या ई-कॉमर्स वाहनांना हॉटस्पॉट किंवा रेड झोन क्षेत्रात परवानगी दिली जाईल. याशिवाय येथे कुरिअर सर्व्हिस वाहनांनाही परवानगी देण्यात येणार आहे.

वाचा-सावधान! 3 मेपर्यंत 'या' 13 सेवा राहणार बंद, वाचा संपूर्ण यादी

सरकारने सांगितले की जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा स्थानिक दुकाने, किरकोळ, मोर्टार स्टोअर किंवा ई-कॉमर्स कंपन्यांमार्फत असतील तर त्या वितरित करण्यास परवानगी देण्यात येईल. यासाठी त्यांना सामाजिक अंतराचे काटेकोरपणे पालन करावे लागेल. अशी अपेक्षा आहे की नवीन मार्गदर्शक तत्त्वांसह शॉपिंग वेबसाइट्स आणि ई-कॉमर्स वेबसाइट ऑर्डर घेण्यास आणि ग्राहकांना वितरीत करण्यास सक्षम असतील.

वाचा-लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात 'या' सेवांना मिळाल्या सवलती, मात्र नियम असणार कडक

या सेवांना सवलती

या मार्गदर्शक सूचनांनुसार रुग्णालये, किराणा दुकान, शेती, ऑनलाईन टीचिंग, मासेमारी या सर्वांना सवलती देण्यात आल्या आहेत. या सर्व सवलती ग्रामीण भागांत आणि हॉटस्पॉट्स नसलेल्या क्षेत्रांसाठी असतील. या सूचनांमध्ये ग्रामीण भागातील उद्योगांमध्ये काम करणाऱ्या मजूरांना जाण्या-येण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिंचन प्रकल्प किंवा नूतनीकरणयोग्य उर्जाशी जोडलेल्या ग्रामीण भागात बांधकाम उपक्रमांना सूट देण्यात आली आहे, मजुरीची उपलब्धता असल्यास स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने मुख्य भागात बांधकामांना परवानगी आहे.

वाचा-लॉकडाऊनसाठी नवी नियमावली जाहीर; 'या' सेवांना दिल्या सवलती, तर ट्रेन बंदच राहणार

या सेवा बंदच राहणार

हवाई सेवा, रेल्वे सेवा, टॅक्सी, मेट्रो यांसारख्या सर्व सेवा बंद राहणार आहेत. त्याचबरोबर मॉल्स, जीम, जलतरण तलाव, बार, हॉटेल्स 3 मेपर्यंत बंद राहणार आहेत. मुख्य म्हणजे हॉटस्पॉट आणि सील केलेल्या भागांसाठी नवीन नियमावली असेल. ही नियमावली 20 एप्रिलनंतर जारी करण्यात येणार आहे.

संकलन, संपादन-प्रियांका गावडे

First published:

Tags: Corona