नवी दिल्ली, 14 जुलै- हिमाचल प्रदेशातील सोलनमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. सोलनमधील कुमारहट्टी-नाहन हायवेवरील एक बहुमजली इमारत कोसळली आहे. या घटनेत 2 जण ठार झाले असून तब्बल 30 लष्करी जवान अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसामुळे कुमारहट्टी-नाहन हायवेवरील गेस्ट हाऊसचा इमारत कोसळली असून ढिगाऱ्याखाली अनेक लोक दबले आहेत.
'एएनआय'नुसार, हिमाचल प्रदेशातील कुमारहट्टीमध्ये एक बहुमजली इमारत कोसळली आहे. ते एक गेस्ट हाऊस होते. दुर्घटना घडली तेव्हा लष्कराचे 30 जवान आणि 7 सामान्य नागरिक रेस्तरॉंमध्ये भोजन करत होते. लष्कराच्या 18 जवान आणि 5 सामान्य नागरिकांना वाचवण्यात आले असून ढिगाऱ्याखालून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अद्याप 14 जण अडकले आहेत. दरम्यान, घटनास्ठळी पोलीस आणि बचाव दलाची टीम पोहोचल्या आहेत. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू आहे. बचाव कार्यात हेलिकॉप्टरची मदत घेण्यात येत आहे. सोबतच गॅस कटर देखील घटनास्थळी पोहोचले आहे.
आपत्ती व्यवस्थापनचे डीसी राणा यांनी सांगितले की, ढिगारा उपसण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेस आता पर्यंत 22 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. पंचकुला येथून एनडीआरएफचे पथक देखील घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. शिमलापासून हे ठिकाण जवळपास 55 किलोमीटर अंतरावर आहे.
हिमाचल प्रदेशचे वनमंत्री गोविंद सिंह ठाकूर यांनी या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
#HimachalPradesh: The building that collapsed in Kumarhatti was a 'Dhaba'. 30 Army men & 7 civilians were present at the spot. 18 Army men & 5 civilian rescued. 2 bodies recovered. 14 feared trapped; rescue operations continue pic.twitter.com/6L3EvfELt9
— ANI (@ANI) July 14, 2019
SPECIAL REPORT : पोलिसांपासून वाचण्यासाठी चोर 'धूम 3' स्टाईलनं पळाला, अन्...