आता हे टॅक्स बंद !

आता हे टॅक्स बंद !

एक देश एक टॅक्स या तत्वानुसार देशभरात जीएसटी लागू झाल्यामुळे 30 जूनच्या मध्यरात्रीपासून अनेक महत्वाचे टॅक्स कायमचे बंद होणार आहेत.

  • Share this:

30 जून- एक देश एक टॅक्स या तत्वानुसार देशभरात जीएसटी लागू झाल्यामुळे 30 जूनच्या मध्यरात्रीपासून अनेक महत्वाचे टॅक्स कायमचे बंद होणार आहेत. यामध्ये विशेषतः केंद्रीय उत्पादन शुल्क, सेवा कर, विक्रीकर तसंच व्हॅट असे अनेक महत्वाचे टॅक्स बंद होणार आहेत. पाहुयात जीएसटीमुळे नेमके कोणकोणते टॅक्स बंद होणार आहेत..

जीएसटीमुळे कोणते टॅक्स बंद होतील ?

केंद्रीय उत्पादन शुल्क (सेंट्रल एक्साइज ड्युटी )

सेवा कर (सर्व्हिस टॅक्स)

अ‍ॅडिशनल कस्टम ड्युटी

स्पेशल अ‍ॅडिशनल ड्युटी ऑफ कस्टम (एसएडी)

व्हॅल्यू अ‍ॅडेड टॅक्स (व्हॅट)

विक्री कर (सेल्स टॅक्स)

केंद्रीय विक्री कर (सेंट्रल सेल्स टॅक्स )

करमणूक कर (एंटरटेनमेंट टॅक्स)

जकात व प्रवेश कर (ऑक्ट्रॉय अ‍ॅण्ड एंट्री टॅक्स )

खरेदी कर (परचेस टॅक्स)

ऐशोआराम कर (लक्झरी टॅक्स)

या सगळ्यांच्या जागी एकच गुड्स अ‍ॅण्ड सव्‍‌र्हिस टॅक्स (वस्तू व सेवा कर) लागेल.

जीएसटी लागू झाल्यावर किती कर भरावे लागतील ?

१. सेंट्रल जीएसटी-हा कर केंद्र सरकार वसूल करेल.

२. स्टेट जीएसटी-हा कर राज्य सरकारे त्यांच्या राज्यातील करदात्यांकडून वसूल करतील.

३. इंटिग्रेटेड (एकत्रित) जीएसटी-दोन राज्यातील व्यापारावर हा कर लागू होईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2017 10:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading