‘जीएसटी’ची 21 ला महत्वपूर्ण बैठक; या वस्तू होऊ शकतात स्वस्त!

‘जीएसटी’ची 21 ला महत्वपूर्ण बैठक; या वस्तू होऊ शकतात स्वस्त!

वस्तुंवरील जीएसटी कर कमी होण्याची शक्यता असल्याने त्यांचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सीएनबीसी आवाजला सांगितले.

  • Share this:

दिल्ली, ता. 19 जुलै : वस्तु आणि सेवा कर प्रणाली ‘जीएसटी’ परिषदेची एक महत्वपूर्ण बैठक शनिवार 21 जुलै रोजी होत आहे. या बैठकीत किमान 30 ते 40 वस्तुंवरील जीएसटी कर कमी होण्याची शक्यता असल्याने त्यांचे दर कमी होण्याची शक्यता असल्याचे सुत्रांनी सीएनबीसी आवाजला सांगितले. यात सॅनिटरी नॅप्किन, देवादिकांच्या मूर्ती, हँडलूम आदी वस्तुंचा समावेश राहू शकतो.

दूध कोंडी फुटली, 25 रूपयांचा दर देणं दूध संघाला बंधनकारक

टीएफ आणि नॅचरल गॅसचे दर कमी करण्यासंदर्भातला मुद्दा यंदा वगळण्यात आला असल्यामुळे, या बैठकीत विमान क्षेत्राला लागणाऱ्या महागड्या इंधनाच्या किमतींत घट होण्याची शक्याता फार कमी असून, ते आहे तसेच राहण्याची शक्यता अधिक असल्याचे सुत्रांनी सांगितले. बैठकीत २८ टक्क्यांपेक्षा कमी दर असलेल्या वस्तुंच्या किमतीत कोणताच फरक पडण्याची शक्यता नाही. आरसीएमला सी-जीएसटी कर प्रणालीतून वगळण्यास वित्त मंत्रालयाची संम्मती असून, तसे अधिकारही जीएसटी परिषदेला देण्यात आले आहेत.

हेही वाचा...

VIDEO : बेरोजगारी दूर करण्यात केंद्र सरकार अपयशी, रामदेव बाबांचा घरचा अहेर

अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधींना घेरण्याचा भाजपचा डाव

आरबीआय लवकरच आणणार शंभराची नवी नोट, कशी असणार जाणून घ्या

 

 

First published: July 19, 2018, 8:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading