News18 Lokmat

GST घोटाळा, 5 कंपन्यांनी केली 800 कोटींची कर चोरी

GST घोटाळा, बनावट कंपन्यांच्या नावावर केला 800 कोटींचा गैरव्यवहार

News18 Lokmat | Updated On: Feb 12, 2019 11:47 AM IST

GST घोटाळा, 5 कंपन्यांनी केली 800 कोटींची कर चोरी

पाटणा, 12 फेब्रुवारी : बिहारमध्ये तब्बल 800 कोटींचा घोटाळा उघडकीस आला आहे. जीएसटी गुप्तचर विभागाने घोटाळा उघडकीस आणला असून बनावट कंपन्यांच्या नावाने गैरव्यवहार केल्याचे समोर आले आहे.

जीएसटीच्या गुप्तचर विभागाने दिल्ली आणि कोलकत्त्यातएकाचवेळी छापा टाकला. यावेळी बनावट पावत्या दाखवून बनावट कंपन्यांनी 144 कोटी रुपयांचे टॅक्स क्रेडिटही मिळवलं. या कंपन्यांनी मालाचा पुरवठा कागदोपत्री केला असून त्याच्या बनावट पावत्या तयार केल्या आणि पैशांचा अपहार केला. यातून सरकारचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे.

स्क्रॅप विक्री करणाऱ्या कंपन्यानी बिहारमधून दिल्ली आणि तिथून कोलकत्त्यात व्यवहार केले. यात नियमबाह्य व्यवहार झाल्याचे दिसून आले. या प्रकणाची चौकशी केली असता पाच कंपन्यांविरोधात 800 कोटींचा अपहार आणि 140 कोटींच्या इनपुट टॅक्स क्रेडिटचा गैरवापर केल्याचं समोर आलं आहे.

जीएसटी घोटाळ्याप्रकरणी तपासासोबत आता कारवाईलाही वेग आला आहे. दोन कंपन्यांनी कोट्यवधींचा माल बनावट कागदपत्रांद्वारे कोलकत्त्यात विकल्याचे समोर आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

VIDEO : एकटा पडला 'राजा', मनसे लोकसभा लढणार?

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags: GSTscamTax
First Published: Feb 12, 2019 11:47 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...