हाॅटेल-रेस्टाॅरंटमध्ये आता द्यावा लागेल फक्त 5 टक्के जीएसटी !

हाॅटेल आणि रेस्टाॅरंटमध्ये जेवणाच्या बिलावर 18 टक्के जीएसटी द्यावा लागत होता. आता तब्बल 13 टक्क्यांनी कपात करण्यात आली असून फक्त 5 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 11, 2017 05:37 PM IST

हाॅटेल-रेस्टाॅरंटमध्ये आता द्यावा लागेल फक्त 5 टक्के जीएसटी !

11 नोव्हेंबर : जीएसटी लागू करून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावणाऱ्या मोदी सरकारने आता माघार घेतलीये. 177 वस्तूंवर कर कपात केल्यानंतर आता हाॅटेल आण रेस्टाॅरंटमधील करातही मोठी कपात केलीये.

गुवाहाटीत भरलेल्या जीएसटी कौन्सिलमध्ये काल 177 वस्तूंवर कर कमी करण्यात आला. या निर्णयानंतर हाॅटेल आणि रेस्टाॅरंटमध्ये जेवणाच्या बिलावर 18 टक्के जीएसटी द्यावा लागत होता. आता तब्बल 13 टक्क्यांनी कपात करण्यात आली असून आता फक्त 5 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे. या निर्णयामुळे एक कोटींहुन अधिक उत्पन्न असणाऱ्या रेस्टाॅरंट टॅक्स क्रेडीटच्या फायद्यापासून दूर होणार आहे. कारण ही रेस्टाॅरंट आणि हाॅटेल देय परतावा करत नव्हती त्यामुळे त्यांना यातून वगळण्यात आलंय

खाण्याचे पार्सल मागवले तरी 18 टक्के जीएसटी !

जेव्हा हाॅटेल आणि रेस्टाॅरंटमधून एखाद्या व्यक्तिने पार्सल जरी मागवले तरी 18 टक्के टॅक्स द्यावा लागत होता. हा टॅक्स हाॅटेलमध्ये एसी लावण्यात आल्यामुळे लावला जात होता.

रूम बूक करताना मिळेल सूट

Loading...

7500 रुपयांपेक्षा जास्त रूम भाडे असलेल्या हाॅटेलसाठी देय प्राप्ती करासह 18 टक्के जीएसटी लावण्यात आलाय. सुरुवातील जीएसटीमध्ये नाॅन एसी रेस्टाॅरंटसाठी 12 टक्के जीएसटी आणि एसी रेस्टाॅरंटसाठी 18 टक्के जीएसटी लावला जात होता. फाईव्ह स्टार हाॅटेलमध्ये तर 28 टक्के कर आकारला जात होतो.

फेडरेशन आॅफ हाॅटेल्स अँड रेस्टाॅरंट असोसिएशन आॅफ इंडियाने जीएसटी परिषदेत सर्व प्रकाराच्या हाॅटेलवर 12 टक्के एकच जीएसटी आकारावा अशी मागणी केली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 11, 2017 05:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...