आजपासून 'या' वस्तू स्वस्त, खरेदी करताना किंमत नक्की पहा!

आजपासून 'या' वस्तू स्वस्त, खरेदी करताना किंमत नक्की पहा!

  • Share this:

नवी दिल्ली, 27 जुलै : सर्वसामान्यांना गरजेची असलेल्या 50 हून अधिक वस्तू आज 27 जुलैपासून स्वस्त होणार आहे. मागील आठवड्यात जीएसटी काऊंसिलची बैठक पार पडली होती. या बैठकीत जवळपास 100 वस्तूंवर जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अर्थमंत्री पियूष गोयल यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या या बैठकीत सॅनिटेरी नॅपकीन जीएसटीमुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसंच 1000 रुपयापेक्षा कमी किंमतीचे बुट-चप्पलांवर 5 टक्के जीएसटी कमी करण्यात आला. तसंच वाॅशिंग मशीनवर टॅक्स 28 टक्क्यांवरून 18 टक्के करण्यात आला. तसंच जीएसटी रिटर्न ही तीन महिन्यातून एकदाच भरावे लागणार आहे.

VIDEO :...आणि नारायण राणेंनी दिल्या उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा !

सॅनिटरी नॅपकीन आणि देवीदेवतांचे फोटो मूर्ती जीएसटीतून वगळण्यात आलंय. फ्रीज, वाशिंग मशीनसह 36 वस्तूंवरच्या जीएसटीत कपात करण्यात आली आहे. जीएसटीतील बोज्यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना केंद्र सरकारने हा दिलासा दिलाय. शनिवारी राजधानी दिल्लीत झालेल्या 28व्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत नागरिकांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले गेले.

PHOTOS : चंद्रग्रहण का आहे महत्त्वाचे?, जाणून घ्या ही 5 कारणं

जीएसटीतून या वस्तू मुक्त

- सॅनिटरी नॅपकीन जीएसटीतून वगळले संपूर्ण करमुक्त

- दगडी, लाकडी, मार्बलच्या मूर्ती जीएसटीतून वगळल्या

- सिम्पल रिटर्न फायलिंगला मंजुरी

- इथेनॉलवरचा जीएसटी 18 वरून 5 टक्क्यांवर

- फ्रीज, वॉशिंग मशीन, ज्युसर, मिक्सर सह 17 वस्तूंचा जीएसटी 18 टक्क्यांवर

- एक हजार रुपयांपर्यतचे पायताण वर केवळ 5 टक्के कर

- पेंट, वार्णिश वरचा जीएसटी 28 वरून 18 टक्के

- बांबू फ्लोअर जीएसटी 12 टक्क्यांवर

- हँडिक्राफ्ट हँडलूमवरच्या जीएसटीत कपात

28 टक्क्यांहून 18 टक्क्यांवर

- लिथियम बॅटरी, टीव्ही, व्हॅक्युम क्लीनर, फ्रुड ग्राइंडर, मिक्सर, स्टोरेज वाटर हिटर, हेड ड्रायर, हँड ड्रायर, पेंट, वार्निश, वॉटर कूलर, मिल्क कूलर, आइसक्रीम कूलर, परफ्युम्स, टॉयलेट स्प्रे

या वस्तूंवर 12 टक्के जीएसटी

 हँडबॅग्स, ज्वैलरी बॉक्स, पेंटिंगसाठी वापरले जाणारे लाकडी बॉक्स, आर्टवेयर ग्लास, हँडमेड लॅप्स

या जीएसटीतील दरकपातीमुळे केंद्र सरकारला 20 हजार कोटींचे नुकसान होणार आहे.

आता 4 आॅगस्टला जीएसटी काऊंसिलची विशेष बैठक होणार आहे. या बैठकीत लघू उद्योगांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

First published: July 27, 2018, 7:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading