हक्काचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर! GST मध्ये कपात

हक्काचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खुशखबर! GST मध्ये कपात

हक्काचं घरं घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

दिल्ली, 24 फेब्रुवारी : जीएसटी काऊन्सिलच्या बैठकीमध्ये सरकारनं घेतलेल्या निर्णयाचा फायदा हक्काचं घर घेऊ इच्छिणाऱ्यांना होणार आहे. कारण, जीएसटीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. 8 टक्क्यावरून आता जीएसटी 1 टक्के करण्यात आला आहे. त्यामुळे घर घेणाऱ्यांसाठी मोठा दिलासा सरकारनं दिला आहे.

तर, बांधकाम चालू असलेल्या घरांवरचा जीएसटी आता 12 टक्क्यावरून 5 टक्के करण्यात आला आहे. जीएसटीचे हे नवे दर एप्रिलपासून लागू होणार आहेत. जुन्या घरांवर देखील आता जीएसटी लागू असणार आहे. सरकारनं सर्विस टॅक्स हटवून जीएसटी लागू केला होता. त्यामुळे घरांच्या किमतीमध्ये काही प्रमाणात का असेना वाढ झाली होती.

काय म्हणाले जेटली?

मेट्रो सिटी अर्थात बंगळुरू, चेन्नई, दिल्ली-एनसीआर, हैदराबाद, कोलकाता आणि मुंबईसारख्या मेट्रो शहरांमध्ये 60 चौरस मीटर चटई क्षेत्रापर्यंतची घरे परवडणारी मानली जातील. तर उपशहरांमध्ये ही मर्यादा 90 चौरस मीटर असेल. रिअल क्षेत्राला चालना देण्यासाठी आम्ही हे पाऊल, उचलल्याचं केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी म्हटलं आहे.

तिसरी खुशखबर

Loading...

यापूर्वी सरकारनं टॅक्स मर्यादा देखील वाढवली होती. शिवाय, पीएफवरील व्याज दरांमध्ये देखील वाढ केली होती. त्यानंतर सरकारनं आता जीएसटीमध्ये कपात करत तिसरा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापूर्वी सरकारनं काही जीवनावश्यक वस्तुंवरील देखील जीएसटीमध्ये कपात केली होती. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सरकारनं सध्या लोकप्रिय निर्णयांचा धडाका लावला आहे.

VIDEO :...जेव्हा रामदास आठवलेंना राग येतो!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 24, 2019 07:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...