18 जानेवारी : 49 गोष्टींवरचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय आज जीएसटी काउन्सिलच्या बैठकीत घेण्यात आला. त्यातही हस्तकला उत्पादनावरील जीएसटी काढून टाकण्यात आला आहे. हस्तकलेच्या 29 गोष्टी करमुक्त झाल्या आहेत. तर शेतीमाल आणि जीवनावश्यक वस्तूवरच कर 12 आणि 18 टक्क्यांनी कमी करण्यात आला आहे.
जीएसटी काऊन्सिलची 25वी बैठक होती. याआधी गुजरात निवडणुकांच्या आधी अशाचप्रकारे कपात करण्यात आली होती. तसंच सीजीएसटी आणि आयजीएसटीमध्ये कायद्यात थोडे बदल करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. वादग्रस्त सॅनिटरी नॅपकिन्सवरचाही कर कमी करण्यात आलेला नाही. तसंच पेट्रोल आणि डिझेलवरच्या कराबद्दल ही काहीच निर्णय घेण्यात आलेला नाही.
1 जुलैल 2017ला भारतात जीएसटी लागू करण्यात आला होता. भारताच्या इतिहासातील ही चौथी मोठी आर्थिक सुधारणा आहे. जीएसटीमुळे अनेक गोष्टी महाग झाल्या होत्या. तसंच काही गोष्टींवरचा जीएसटी काढून टाकण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: GST, India, Maharashtra, Result, जीएसटी काऊन्सिल, निकाल, निर्णय, बैठक, महागाई