LIVE GST : जीएसटी लागू झाला हो..!!!

स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखल्या जाणारा जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) आज मध्यरात्रीपासून देशभरात लागू

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jul 1, 2017 12:06 AM IST

LIVE GST : जीएसटी लागू झाला हो..!!!

जीएसटी म्हणजे गुड आणि सिम्पल टॅक्स -पंतप्रधान मोदी

जीएसटी सर्वांच्या फायद्यांचं, अफवांवर विश्वास ठेवू नका, पंतप्रधान मोदींचं आवाहन

देश कसा चाललाय याकडे लक्ष द्या -पंतप्रधान मोदी

Loading...

आता अधिकाऱ्यांच्या जाचातून मुक्तात -पंतप्रधान मोदी

टॅक्स राज आता संपुष्टात -पंतप्रधान मोदी

प्रत्येक राज्यात वेगवेगळे कर भरावे लागत होते -पंतप्रधान मोदी

जीएसटीमध्ये गरिबांचा विचार करण्यात आलाय- पंतप्रधान

जीएसटी भारतीय शक्तिच दर्शन घडवणार - मोदी

गीतेचे 18 अध्याय होते,जीएसटीच्या 18 बैठका झाल्यात हा एक योगायोग - पंतप्रधान मोदी

देश नव्या व्यवस्थेच्या दिशेनं वाटचाल करतोय -मोदी

जीएसटी म्हणजे एक नवं पर्व, एक नवी सुरुवात - पंतप्रधान मोदी

कोणत्या एका पक्षाचे हे श्रेय नाही -पंतप्रधान मोदी

जीएसटी हे कोणत्याही एका सरकारचं यश नाही -पंतप्रधान मोदी

हा प्रवास 15 वर्षांपासून सुरू झाला होता -जेटली

आपण एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होत आहोत -जेटली

=================================================================

30 जून :  स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी कर सुधारणा म्हणून ओळखल्या जाणारा जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) आज मध्यरात्रीपासून देशभरात लागू होणार आहे. पण त्याआधी जीएसटीच्या लाँचिंग समारंभ संसदेत पार पडणार आहे. या समारंभासाठी संसद भवनाच्या इमारतीला रोषणाईने सजवण्यात आलंय. हा समारंभ नेहरूंच्या 'ट्रायस्ट विथ डेस्टिनी' या प्रसिद्ध भाषणाच्या पार्श्वभूमीवर घेतला जाईल आणि याचं नाव 'ट्रायस्ट विथ डेस्टिनेशन टॅक्स' असेल.

हा कार्यक्रम संसद भवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये घेतला जाणार आहे. हा कार्यक्रम आज (30 जून ) मध्यरात्री आयेजित केलाय. हा कार्यक्रम 80 मिनिटं चालेल. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी येण्याच्या आधी 10 मिनिटं जीएसटीवरची एक छोटीशी फिल्म दाखवली जाईल.

या कार्यक्रमाचं आमंत्रण संसदेच्या सदस्यांशिवाय 100 पब्लिक पर्सनॅलिटीजला दिलेलं आहे. राष्ट्रपती,उपराष्ट्रपती,स्पीकर, माजी  प्रधानमंत्री मनमोहन सिंह आणि एच .डी. देवेगौडाही मंचावर उपस्थित असतील. तसंच प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा, अभिनेते अमिताभ बच्चन, लता मंगेशकर, सोली सोराबजी, के.के. वेणुगोपाल आणि हरीश साळवे या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत.

तसंच भाजपचे अध्यक्ष अमित शहा, माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा, आरबीआयचे विद्यमान गव्हर्नर ऊर्जित पटेल, आरबीआयचे माजी गव्हर्नर सी रंगराजन, विमल जालान आणि डी सुब्बारावदेखील कार्यक्रमास येणार आहेत. अजूनही बरेच दिग्गज या कार्यक्रमास उपस्थित राहतील.

या कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणव मुखर्जी आणि पंतप्रधान मोदींची भाषणं जवळजवळ अर्धा तास चालतील.जीएसटी लॉँच केल्यानंतर दोन मिनिटांची एक फिल्मही दाखवली जाईल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 30, 2017 11:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...