मोदी सरकारकडून न्यू इयर गिफ्ट, 33 वस्तू होणार स्वस्त

मोदी सरकारकडून न्यू इयर गिफ्ट, 33 वस्तू होणार स्वस्त

केंद्र सरकारने एकूण 33 वस्तूंवर जीएसटी कमी करण्याचा निर्णय जाहीर केला.

  • Share this:

नवी दिल्ली, 22 डिसेंबर : नवी दिल्लीत जीएसटी काऊंसिलची 31 वी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये एकूण 33 वस्तूंवर जीएसटी कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पत्रकार परिषद घेऊन

33 वस्तूंवर जीएसटी कमी करण्यात आल्याची घोषणा केली आहे. 22 वस्तुंवरील 28 टक्क्यांपेक्षा जीएसटी कमी करणार आला आहे. अशा एकूण 33 वस्तुंवरील जीएसटी कमी होणार आहे.जीएसटीचे नवे दर हे 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. हे दर कमी झाल्यामुळे तिजोरीवर 5500 कोटींची बोझा पडणार आहे.

जीएसटी काऊंसिलच्या बैठकीमध्ये 28 टक्के जीएसटी असलेल्या वस्तूवर कर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण 6 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी होता तो आता 18 टक्के असणार आहे. त्यामुळे आता 28 टक्के जीएसटी असलेल्या 34 वस्तू उरल्या आहेत.

सिनेमाचं तिकिटावरील जीएसटी कमी करण्यात आला आहे. यापुढे 100 रूपयांपर्यंतच्या सिनेमा तिकिटांवर जीएसटी 12 टक्के तर 100 रूपयांपेक्षा जास्त तिकिटांवर 18 टक्के जीएसटी लागणार आहे. तसंच प्रवास यात्रेवरील जीएसटी 5 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 32 इंची एलईडी टीव्हीवर 28 टक्क जीएसटी आता कमी करण्यात आला आहे.त्यामुळे यापुढे 32 इंचाच्या टीव्ही खरेदीवर 18 टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे.त्याचबरोबर टायर, VCR, लिथियम बॅटरीवरील 28 टक्के जीएसटीवरुन 18 टक्के करण्यात आला आहे.

केंद्र सरकारने एकूण 33 वस्तूंवर जीएसटी कमी करण्याचा निर्णय जाहीर केला. परंतु, सिमेंट आणि लक्झरी वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम राहणार आहे.

महाराष्ट्र आणि बंगालमध्ये जीएसटीची चांगली वसुली झाली. मागील वर्षी 8 महिन्यात 48,000 कोटी भरपाई देण्यात आली अशी माहितीही जेटली यांनी दिली. पुढील जीएसटी कांऊसिलची बैठक ही 1 जानेवारी 2019 रोजी होणार आहे. या बैठकीमध्ये बांधकाम व्यवसायसंबंधी चर्चा होणार आहे.बांधकाम व्यवसायामध्ये जीएसटी कमी करण्याचे संकेत अरुण जेटली यांनी दिले आहे.

==========

First published: December 22, 2018, 4:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading