छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा,आता तीन महिन्यांनीच भरा रिटर्न

छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा,आता तीन महिन्यांनीच भरा रिटर्न

छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. या निर्णयानुसार दीड कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांनी दर तीन महिन्यांनी जीएसटी रिटर्न दाखल करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 आॅक्टोबर : वाढत्या महागाईमुळे केंद्रातील मोदी सरकार चौफेर टीकेचे लक्ष्य होत आहे. त्या पार्श्वभूमीवर छोट्या व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे. या निर्णयानुसार दीड कोटी रुपयांपर्यंत उलाढाल असलेल्या छोट्या व्यापाऱ्यांनी  दर तीन महिन्यांनी जीएसटी रिटर्न दाखल करण्यासाठी तीन महिन्यांचा अवधी देण्यात येणार आहे.जीएसटी बैठक संपल्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटलींनी पत्रकार परिषदेत हे बदल सांगितले.

त्याचप्रमाणे 50 हजार रुपयांवरील खरेदीसाठी पॅनकार्ड असणे अनिवार्य करण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. आता 2 लाख रुपयांवरील  खरेदीसाठी पॅनकार्ड आवश्यक असेल. त्याबरोबरच रत्न आणि दागिन्यांना जीएसटी नोटिफिकेशनच्या चौकटीतून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जीएसटी कॉन्सिलची आज 22 वी बैठक झाली. जीएसटीमुळं व्यापाऱ्यांना जो त्रास होतोय त्यावर बैठकीत चर्चा झाली. सकाळी 10.30वाजल्यापासून ही बैठक सुरू होती.

जीएसटीच्या मुद्द्यावरून मोदी सरकारला सगळीकडूनच टीकेचा धनी व्हावे लागत आहे. पण आता मोदी सरकारच्या जीएसटी लागू करण्याच्या निर्णयाचे जागतिक बँकेने समर्थन केले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ ही स्वाभाविक आहे. जीएसटी लागू केल्यामुळे दिसणारे हे तात्पुरते परिणाम आहेत. येत्या काही महिन्यांमध्ये ही संपूर्ण मरगळ झटकून भारतीय अर्थव्यवस्था नवी उभारी घेईल, असं जागतिक बँकेने म्हटले आहे.

जीएसटी कॉन्सिल बैठकीत महत्त्वाचे मुद्दे

प्रत्येक निर्यातदाराचे ई व्हॉलेट तयार होणार

निर्यातीचा जुलै ऑगस्टाचा रिफंड लवकरच दिला जाईल

निर्यातीवर सर्वात कमी जीएसटी 0.1 टक्के असणार

अन्नपदार्थांवरील जीएसटीमध्ये मोठी सूट

आयुर्वेदिकऔषध 12 वरून 5 टक्के जीएसटी

डिझेल इंजिनवरील जीएसटी 28 वरून 18 टक्क्यांवर आणला

हाॅटेलसाठी जीएसटी 18 टक्क्यांवरून 12 टक्के

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2017 08:53 PM IST

ताज्या बातम्या