जीएसटीला एक महिना पूर्ण; या महिन्यात आढावा बैठक

जीएसटीला एक महिना पूर्ण; या महिन्यात आढावा बैठक

जीएसटी परिषदेच्या या प्रस्तावित बैठकीमध्ये आतापर्यंत विविध वस्तू आणि सेवा यांच्यावरील जीएसटीच्या दरांचाही आढावा घेण्यात येणार आहे.

  • Share this:

1 ऑगस्ट : वस्तू आणि सेवा कर म्हणजे जीएसटी 1 जुलैला लागू झाला. त्याला आज एक महिना पूर्ण झाला. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी करप्रणालीला संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.

देशभरातल्या 12 लाखांहून अधिक छोट्या व्यावसायिकांनी जीएसटीमध्ये नव्याने नोंदणी करण्यासाठी अर्ज केले आहेत. तसंच जीएसटी लागू झाल्यानंतर विविध उद्योगांच्या क्षेत्रनिहाय संघटनांनी करविषयक प्रश्न सरकार दरबारी मांडले आहेत. त्या सर्वांचा एकत्रित विचार करण्याचं जीएसटी परिषदेने ठरवलं आहे.

जीएसटी परिषदेची बैठक या महिन्यात होणार असल्याची शक्यता आहे. जीएसटी परिषदेच्या या प्रस्तावित बैठकीमध्ये आतापर्यंत विविध वस्तू आणि सेवा यांच्यावरील जीएसटीच्या दरांचाही आढावा घेण्यात येणार आहे.

First published: August 1, 2017, 8:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading