इस्त्रोची लय 'भारी' कामगिरी, सर्वात वजनदार GSLVMK3ची यशस्वी भरारी

इस्त्रोची लय 'भारी' कामगिरी, सर्वात वजनदार GSLVMK3ची यशस्वी भरारी

जास्त वजनाचे उपग्रह इस्त्रो विदेशातून प्रक्षेपित करत होता. हे प्रक्षेपण यशस्वी झाल्यामुळे इस्त्रोकडे आता मोठया वजनाचे उपग्रह सोडण्याची क्षमता मिळाली आहे

  • Share this:

05 जून : भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोच्या शिरपेचात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय. इस्त्रोने आज सर्वात जास्त वजनाच्या रॉकेटच्या साह्याने जीएसएलव्ही-एमके 3 डी1 उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण केलंय.

श्रीहरिकोटा अंतराळा संशोधन केंद्रावरुन इस्त्रोने वजनदार भरारी घेतलीये.  सर्वात जास्त वजनाचं रॉकेट  GSLV-MK 3 D1 चं प्रक्षेपण करण्यात आलं. या उपग्रहाचं वजन 3 हजार 136 किलो इतक आहे.  भारतीय बनावटीच्या क्रायोजनिक इंजिनाच्या साह्यानं या रॉकेटने यशस्वी झेप घेतली.  इस्त्रोकडे 2 हजार 300 किलोपर्यंतचा उपग्रह सोडण्याची क्षमता होती.

त्यामुळे जास्त वजनाचे उपग्रह इस्त्रो विदेशातून प्रक्षेपित करत होता. हे प्रक्षेपण यशस्वी झाल्यामुळे इस्त्रोकडे आता मोठया वजनाचे उपग्रह सोडण्याची क्षमता मिळाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2017 06:06 PM IST

ताज्या बातम्या