श्रीहरीकोट्यात जीएसएटी-6ए उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोट्यात जीएसएटी-6ए उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

जीएसएटी 6ए हा उपग्रह प्रामुख्यानं दळणवळणासाठी आहे. या उपग्रहाचं आयुर्मान 10 वर्षं आहे. या उपग्रहाचं वजन 2 टन 140 किलो आहे

  • Share this:

29 मार्च:  आज जीएसएटी-6ए  या उपग्रहाचं  संध्याकाळी 4 वाजून 56 मिनिटांनी श्रीहरिकोटाहून यशस्वी प्रक्षेपण झालं आहे.  जीएसएलव्ही  एमके-2 या रॉकेटमधून हा उपग्रह सोडला गेला.

जीएसएटी 6ए हा उपग्रह   प्रामुख्यानं दळणवळणासाठी  आहे. या उपग्रहाचं आयुर्मान 10 वर्षं  आहे. या उपग्रहाचं  वजन 2 टन 140 किलो आहे.सतीश धवन स्पेस सेंटरच्या दुसऱ्या हवाईपट्टीवरून या रॉकेटने आकाशात झेप घेतली.जीएसल्व्ही रॉकेट उपग्रह सोडण्यासाठी  12व्यांदा आकाशात झेपावलं आहे.   हा उपग्रह 36,000 किलोमीटर उंचीवर सोडण्यात आला आहे. यामुळे अंतराळात अजून एक उपग्रह झेपावला आहे. ज्या रॉकेटनेही हा उपग्रह आकाशात सोडला त्याचं नाव इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी सांकेतिक भाषेत खोडकर मुलगा असं ठेवलं होतं.

यामुळे आता इस्त्रोच्या शिरपेचात नवीन तुरा खोवला गेला आहे.

 

First published: March 29, 2018, 5:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading