'बेनामी संपत्ती जमवणाऱ्याची माहिती द्या 1 कोटी मिळवा'

'बेनामी संपत्ती जमवणाऱ्याची माहिती द्या 1 कोटी मिळवा'

यासोबतच कर बुडवणाऱ्या व्यक्तींच्या विरोधातही अर्थ मंत्रालयाने कंबर कसलीये. करबुडव्यांची माहिती देणाऱ्याला 50 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 01 जून : बेनामी संपत्तीवर टाच आणण्यासाठी अर्थ मंत्रालयाने एक नवी योजना सुरू केलीये. जर तुम्ही बेनामी संपत्ती जमा करणाऱ्यांची माहिती दिली तर मंत्रालयाकडून तुम्हाला एक कोटी रुपयांचं बक्षीस दिलं जाणार आहे.

अर्थ मंत्रालयाने दिलेल्या आदेशानुसार, बेनामी संपत्ती जमवणाऱ्याची माहिती आयकर विभागाला द्यावी लागेल, अशी माहिती देणाऱ्या व्यक्तीला एक कोटींचं बक्षीस दिलं जाईल.  बेनामी ट्रांजेक्शंस इन्फॉर्मेंट्स रिवॉर्ड स्कीम, 2018 नुसार हे बक्षीस दिलं जाणार आहे.

या योजनेचा फायदा परदेशी नागरिकही घेऊ शकणार आहे. माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाणार आहे. या योजनेची माहिती आयकर विभागाच्या वेबसाईटवर उपलब्धवर आहे.

यासोबतच कर बुडवणाऱ्या व्यक्तींच्या विरोधातही अर्थ मंत्रालयाने कंबर कसलीये. करबुडव्यांची माहिती देणाऱ्याला 50 लाखांचे बक्षीस दिले जाणार आहे. अशा करबुडव्यांची माहिती तुम्हाला आयकर विभागाला द्यावी लागणार आहे.

First published: June 1, 2018, 11:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading