पैसे आणि वर्चस्वासाठी काश्मीरमध्ये दहशतवादी गटांमध्येच भांडणं

पैसे आणि वर्चस्वासाठी काश्मीरमध्ये दहशतवादी गटांमध्येच भांडणं

इस्लामीक स्टेट या दहशतवादी संघटनेने प्रेरीत होऊन जे गट तयार झाले त्यांच्यात आणि इतर गटांमध्ये भांडणं सुरू असून त्यात एकाचा बळीही गेलाय.

  • Share this:

संदीप बोल, श्रीनगर 28 जून : जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी गट विरुद्ध सुरक्षा दलं असा सामना आत्तापर्यंत होत होता. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये दहशतवादी गटांमधली भांडणं उघड झाली आहेत. इस्लामीक स्टेट या दहशतवादी संघटनेने प्रेरीत होऊन जे गट तयार झाले त्यांच्यात आणि इतर गटांमध्ये भांडणं सुरू असून त्यात एकाचा बळीही गेलाय. जुने दहशतवादी गट हे आपलं वर्चस्व सोडायला तयार नाहीत तर नव्यांना आपलं वर्चस्व सिद्ध करायचं आहे त्यामुळेच ही भांडणं असल्याचा दावा संरक्षण तज्ज्ञांनी केलाय.

काश्मीरमध्ये इस्लामिक स्टेट हिंद प्रोव्हिंस ही नवी दहशतवादी संघटना आपला जम बसविण्यासाठी प्रयत्नशील आहे. इस्लामीक स्टेट या संघटनेची मुळ काश्मीरमध्ये रुजविण्याचा या संघटनेचा प्रयत्न आहे. जैश ए मोहम्मद आणि लष्करे तोयबा सारख्या इतर संघटनांशी या गटाचं पटत नाही. काश्मीरमधल्या इस्लामीक स्टेटच्या गटाला देशाबाहेरून पैसा मिळत होता, मात्र  सुरक्षा दलांनी मुसक्या आवळल्याने या संघटनेचे सर्व स्त्रोत बंद झालेत. पाकिस्तानही या संघटनेला मदत करत नाही.

ISJKच्या आदिल अहमद दास या दहशतवाद्याला हिजबुलच्या काही लोकांनी भेटीला बोलावलं होतं. आदिल जेव्हा भेटायला आला तेव्हा तो आपल्या तीन साथिदारांनाही घेऊन आला. तेव्हा दोन्ही गटांमध्ये वाद झाला आणि त्यात आदिल मारला गेला. त्यानंतर दोन्ही गटांमध्ये अनेक चकमकी झाल्याची माहितीही सूत्रांनी दिलीय.

काश्मीर प्रश्न नेहरुंमुळेच

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरप्रश्नी संसदेत निवेदन दिलं. दिवंगत पंतप्रधान पंडित जहवारलाल नेहरू यांनीच काश्मीर प्रश्न निर्माण केला, त्यावेळी त्यांनी तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनाही विश्वासात घेतलं नाही, अशी जोरदार टीका अमित शहा यांनी केली.

काँग्रेसने काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसचं युनिट तिथे कधी उभंच राहिलं नाही. काश्मीरची सूत्रं म्हणूनच शेख अब्दुल्लांच्या हातात गेली आणि त्यांनी त्याचा गैरफायदा घेतला, असंही अमित शहा म्हणाले.

आमच्या सरकारने सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक केला पण यामध्ये एकाही काश्मिरी नागरिकाचा बळी गेलेला नाही, असं त्यांनी सांगितलं.

'टुकडे टुकडे गँग'

काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण आहे, असं काहीजण म्हणतात. पण जे देशाच्या विरोधात आहेत त्यांच्या मनात भीती असायलाच हवी. आम्ही टुकडे टुकडे गँग मध्ये सहभागी नाही, आम्ही काश्मिरी लोकांच्या विरोधात नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

First published: June 28, 2019, 7:02 PM IST

ताज्या बातम्या