अक्षय कुडकेलवार, 16 फेब्रुवारी : पुलवामातील भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय तपास यंत्रणांनी या हल्ल्यामागच्या सूत्रधारांचा शोध सुरू केला असून जैश-ए-मोहम्मदच्या संपर्कात असलेल्या १०-१२ तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या हल्ल्याची कुणकुण गुप्तचर विभागाला लागली होती. मात्र, त्या दहशतवाद्यांना वेळीच जेरबंद करण्यात तपास यंत्रणांना अपयश आलं. आता तपास यंत्रणांनी दहशतवाद्यांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी कंबर कसली आहे.