मराठी बातम्या /बातम्या /देश /Ground Report : गाझियाबादमधून 'जनरल' मारणार का दुसऱ्यांदा बाजी?

Ground Report : गाझियाबादमधून 'जनरल' मारणार का दुसऱ्यांदा बाजी?

 माजी लष्करप्रमुख आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांना भाजपने पुन्हा एकदा या मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.

माजी लष्करप्रमुख आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांना भाजपने पुन्हा एकदा या मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.

माजी लष्करप्रमुख आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांना भाजपने पुन्हा एकदा या मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.

    गाझियाबाद,7 एप्रिल : सध्या पश्चिमी उत्तर प्रदेशामध्ये लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा होत आहे. जवळपास सात टप्प्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत गाजियाबाद लोकसभा मतदारसंघ पहिल्या टप्प्यात निवडणुकीला सामोरे जाणार आहे.  माजी लष्करप्रमुख आणि परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही.के. सिंग यांना भाजपने पुन्हा एकदा या मतदारसंघातून तिकीट दिलं आहे.

    आहे रे आणि नाही रे वर्ग

    गाझियाबाद लोकसभा मतदारसंघाचे दोन दोन विभाग करावे लागतील. एक श्रीमंताचे गाझियाबाद तर दुसरे गरिबांचे गाझियाबाद, एकीकडे प्रचंड श्रीमंती शहरी बडेजावपणा आणि दुसरीकडे दुसरीकडे गरिबीचा कडवटपणा या मतदारसंघात पाहायला मिळतो. मोहन नगर, वैशाली, वसुंधरा, कौशंबी, यासारख्या अनेक श्रीमंतांच्या गाझियाबाद मध्ये प्रचार मोहिम पाहताना शहरी बडेजावपणा प्रत्यक्ष जाणवला.

    राजकीय पक्षाचे उमेदवार या भागातून प्रचार करताना पूर्वीच घराघरात हार आणि गुलाबाच्या पाकळ्या पोहोचवायचे म्हणजे जेव्हा या रस्त्यावरून नेत्यांचा काफिला जाईल तेव्हा त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करता यावा यासाठी हे नियोजन असायचे. या भागात गुजर आणि राजपूत समाजाचे प्राबल्य आहे. त्याचमुळे या बलाढ्य मतदारसंघातून 2009 मध्ये  केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग विजयी झाले होते तर 2014 मध्ये माजी लष्करप्रमुख जनरल व्ही.के. सिंग विजयी झाले होते.

    सुविधांचा अभाव

    जेव्हा गरीब गाझियाबादकडे नजर वळते तेव्हा लक्षात येतं एकीकडे श्रीमंतांच्या गाझियाबाद मध्ये  चोवीस तास वीज असते तर दुसरीकडे निवडक तासही वीज मिळत नाही.

    जी मुस्लिमांची गावं आहेत ती भेदरलेल्या अवस्थेत असतात तर जी राजपुतांची गावं आहे ती दबंगशाही दाखवण्याच्या नेहमी तयारीत असतात. या सर्व परिस्थितीमध्ये दलित मात्र आपलं वेगळं अस्तित्व दाखवण्याचा प्रयत्न करत असतो.

    जर गाझियाबादमध्ये आकडेवारी बघितली तर लक्षात येते जवळपास 29 टक्के इतर मागास वर्ग, 22 टक्के सवर्ण समाज, 13 टक्के मुस्लिम, सात टक्के दलित ही आकडेवारी उमेदवाराच्या विजयासाठी साठी महत्त्वाची ठरते. व्ही.के.सिंग यांच्याविरुद्ध काँग्रेस पक्षाच्या वतीने डॉली शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर समाजवादी पक्षाने सुरेन्द्र कुमार यांना गाझियाबादच्या लढाईत उतरविले आहे. सत्तावीस लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या मतदारसंघात ग्रामीण भागतल्या लोकांचा कल हा काहीसा आघाडीच्या बाजूला आहे.

    शहरी आणि ग्रामीण भाग

    पण शहरी मतदार बघता भारतीय जनता पक्ष आघाडीवर राहण्याची शक्यता आहे. ग्रामीण मतदारांच्या तुलनेत शहरी बहुल मतदार गाझियाबाद मध्ये आहे त्यामुळे नेहमीच गाझियाबाद मध्ये शहरी भागाचे पारडे जड असते. या भागातील मुस्लिम शांत आहेत. ते कुठल्याही पक्षाच्या बाबतीत मत व्यक्त करायला तयार नाही त्या तुलनेत सवर्ण  समाजाचा काही वर्ग हा  आघाडीच्या बाजूने असल्याचे जाणवते या भागात सवर्ण समाज आणि ओबीसी एकत्र येऊन उमेदवार निवडून आणण्याची क्षमता ठेवतो.

    गावातून फिरताना इथे बैलगाडीऐवजी बुगी पाहायला मिळते बुगी म्हणजे ज्याला एक रेडा ओढण्याचे काम करतो. बहुतांशी बुगीच्या चालक या महिला असतात, त्या घराच्या दारात जमा होणाऱ्या शेणाला एकत्र करून प्रत्येकाच्या ठरलेल्या जागेवर टाकतात. पण जर शहरात जायचे असेल तर या बुग्गीचा चालक पुरुष होतो. आणि त्या रेड्याच्या  मानेवरून चालणाऱ्या या दोन चाकी वाहनाच्या वर ऊस लादलेला असतो. बिडीचा झुरका सोडत हा चालक मस्त होऊन जात असल्याचे पहायला मिळते.

    उसाचं राजकारण

    पश्चिमी उत्तर प्रदेश तसेच संपन्न प्रदेश मानला जातो पण उसाचे नवीन ऊसाचे न मिळणारे पैसे अनेक वर्षापासून थकलेला असल्याने त्याचा गावांना फटका बसलाय. शेतात सध्या गव्हाचे पिक पाहायला मिळते होळीच्या वेळी याच उबयांना होळीच्या तापात भाजून खाण्याची प्रथा देखील येथेच आहे. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार हा मोदींचे नाव घेऊन प्रचार अभियान राबवत आहे. प्रत्येक उमेदवार मोदींच्या नावावर मताचा जोगवा मागत आहे. मात्र त्याने केलेल्या कामाचा तो लेखाजोखा मांडताना हतबल असल्याचेही पहायला मिळत आहे.

    समाजवादी पक्ष बहुजन समाज पक्ष आणि राष्ट्रीय लोक दल या आघाडीचे उमेदवार तीन झेंडे हातात घेऊन मतदारांच्या घरोघरी जात आहेत. मात्र या गावातून जाताना धुक्यासारखी उडणारी धूळ याकडे राजकीय नेते दुर्लक्षही करीत आहे पण दर पाच वर्षांनी येणार्‍या निवडणुकीत नेहमी जातच वरचढ ठरते हा या भागाचा इतिहास आहे.

    First published:
    top videos

      Tags: BJP, Election 2019, Lok sabha election 2019, Politics