Home /News /national /

दोन भावांचं झालं एका मांडवात लग्न; पण या मागणीसाठी वधूंनी गाठलं पोलीस ठाणे

दोन भावांचं झालं एका मांडवात लग्न; पण या मागणीसाठी वधूंनी गाठलं पोलीस ठाणे

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

वधूच्या वडिलांनी हुंडा देण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर ते दोघे भाऊ निर्लज्जपणे वधूंना न घेताच वरात घेऊन घरी परतले. रात्रभर जल्लोष केल्यानंतर सकाळी निरोपाच्या वेळी हुंड्याची मागणी केल्यानं वातावरण चिघळलं.

    बयाना, 15 मे : दोन भावांचं एका दिवशी एकाच मांडवात लग्न (marriage) करण्याचं ठरलं होतं. त्याप्रमाणे सगळे विधी पार पडले. दोन्हीकडचे नातेवाईकही खूश होते. मात्र, या दोन भावांच्या मनात काही वेगळंच होतं. सगळे विधी आटोपल्यानंतर त्यांनी अशी काही मागणी केली की, दोन्ही वधू संतापल्या आणि थेट पोलीस ठाण्यात जाऊन पोहोचल्या. लग्नाचे विधी पार पडले असले तरी त्या आता आपल्या नवऱ्यांसोबत जाण्यास मुळीच तयार नाहीत. त्यांनी आपल्या पतींचा खरा चेहरा समोर आल्याचं म्हटलंय. रिपोर्टनुसार,  सिकंदरा येथे राहणाऱ्या दोन बहिणींचा विवाह रामपुरा येथील रहिवासी असलेल्या दोन भावांशी झाला होता. राजस्थानच्या भरतपूरच्या बायनामध्ये हुंड्याच्या मागणीसाठी लग्नाचे विधी पार पडल्यानंतर नववधूंना त्यांच्या वरांनी सोडून दिल्याची घटना समोर आली आहे. हे वाचा - पत्नीने दुसरे लग्न केले, पहिल्या पत्नीने उचलले 'हे' धक्कादायक पाऊल रात्रभर चाललेल्या लग्नाच्या कार्यक्रमानंतर वरातीत आलेल्या मंडळींनी सकाळी निरोपाच्या दिवशी हुंडा (dowry) मागितला. दोन्ही वरांनी हुंड्यात पाच लाख रुपये रोख, दुचाकी आणि सोन्याचे दागिने मागितले. एवढ्या मोठ्या मागणीनंतर वधूच्या वडिलांनी हुंडा देण्यास असमर्थता दर्शवली. त्यानंतर ते दोघे भाऊ निर्लज्जपणे वधूंना न घेताच वरात घेऊन घरी परतले. रात्रभर जल्लोष केल्यानंतर सकाळी निरोपाच्या वेळी हुंड्याची मागणी केल्यानं वातावरण चिघळलं. वधू पक्षाकडून खूप समजावल्यानंतरही वरांना न पटल्याने ते मिरवणुकीसह निघून गेले. हे वाचा - VIDEO: महिला मंत्र्याचा प्रताप; कर्मचाऱ्याला सांगितले शूजचे डिस्पोजेबल काढायला लग्नात सजलेल्या नववधूंनी तशाच स्थितीत नातेवाइकांसह पोलीस ठाणं गाठलं आणि वर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल केला. एवढा मोठा प्रसंग घडल्यानंतरही नववधूंनी धाडस दाखवलं. लग्न लागल्यानंतर काही काळातच पतींचा हुंड्यासाठी लोभी असलेला चेहरा सर्वांसमोर आला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत पतींसोबत जायचं नाही, असा निर्धार या वधूंनी केला आहे.
    Published by:Digital Desk
    First published:

    Tags: Marriage, Rajasthan

    पुढील बातम्या