• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • मंडपातून फरार झाला नवरदेव; वरातीतील पाहुण्यानंच केलं संधीचं सोनं, नवरीसोबत घेतले सात फेरे

मंडपातून फरार झाला नवरदेव; वरातीतील पाहुण्यानंच केलं संधीचं सोनं, नवरीसोबत घेतले सात फेरे

एक अजब घटना समोर आली आहे. या घटनेत नवरदेवानं (Groom) नाही तर नवरदेबासोबत आलेल्या वरातीतील पाहुण्यानंच नवरीसोबत (Bride) सात फेरे घेतले आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली 17 मे : लग्नामध्ये (Marriage) नवरदेवासोबत भरपूर वराती आल्याचं आपण अनेकदा पाहिलं असेल. मात्र, आता एक अजब घटना समोर आली आहे. या घटनेत नवरदेवानं (Groom) नाही तर नवरदेबासोबत आलेल्या वरातीतील पाहुण्यानंच नवरीसोबत (Bride) सात फेरे घेतले आहेत. ही घटना कानपूरच्या नरवल भागात घडली आहे. हे लग्न आता चर्चेचा विषय ठरलं आहे. त्याचं झालं असं, की महराजपूरच्या नरवल येथे शुक्रवारी एक लग्नसमारंभ पार पडणार होता. नवरा मुलगा जवळच्याच गावातील होता मात्र ऐनवेळी या लग्नात नवं वळण आलं. नवरीच्या घरी वरात आली आणि सर्व तयारीही झाली. मात्र, वरमाळा घालण्याची वेळ आली तेव्हा नवरदेव लग्नातून गायब झाला. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार, ऐन समारंभातून नवरदेव गायब झाल्यानं सर्वच आश्चर्यचकीत झाले. वर आणि वधू पक्षाकडील लोकांवर तर जणू आभाळच कोसळलं. यानंतर नवरदेवाला भरपूर वेळ शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, नंतर समोर आलं की नवरदेव गायब झाला नाही तर स्वतःच पळून गेला आहे. ही बाब समजताच नवरीकडच्या लोकांची रडून परिस्थिती वाईट झाली. कारण, त्यांच्या मुलीचं लग्न मोडलं होतं. शेवटी त्यांनी हे स्थळ सुचवणाऱ्या पाहुण्यांनाच गाठलं आणि या समस्येवर उत्तर मागितलं. यादरम्यान आणखी एक अजब घटना घडली. वरातीत नवरदेवासोबत आलेला एक तरुण नवरीसोबत लग्नासाठी तयार झाला. त्यानं नवरीच्या घरच्यांसमोर हा प्रस्ताव ठेवला. मग काय, थोडाही उशीर न करता त्या वरातीत आलेल्या तरुणासोबतच नवरीबाईनं सात फेरे घेतले. आता हे दोन्ही पक्ष पोलीस ठाण्यात पोहोचले आहेत. मुलीकडच्या लोकांच्या आधीच्या नवरदेवाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर, मुलाच्या घरच्यांनी त्याला शोधण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाणं गाठलं आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
  Published by:Kiran Pharate
  First published: