मराठी बातम्या /बातम्या /देश /हुंडा नाकारला, वस्तू ठोकरल्या! नववधूला नेलं मित्राच्या बाईकवरून

हुंडा नाकारला, वस्तू ठोकरल्या! नववधूला नेलं मित्राच्या बाईकवरून

हुंड्यासाठी आडून बसणाऱ्यांना एका तरुणाने आपल्या भन्नाट कृतीतून संदेश दिला आहे. सध्या त्याचं जोरदार कौतुक होत आहे.

हुंड्यासाठी आडून बसणाऱ्यांना एका तरुणाने आपल्या भन्नाट कृतीतून संदेश दिला आहे. सध्या त्याचं जोरदार कौतुक होत आहे.

हुंड्यासाठी आडून बसणाऱ्यांना एका तरुणाने आपल्या भन्नाट कृतीतून संदेश दिला आहे. सध्या त्याचं जोरदार कौतुक होत आहे.

रोहतक, 15 डिसेंबर: वधूच्या आईवडिलांकडून देण्यात येणारा हुंडा (Dowry) नाकारून आणि आपल्या मित्राची बाईक (Friend's bike) उधारीवर घेऊन लग्न केलेल्या तरुणाची सध्या जोरदार (Viral on social media) चर्चा रंगली आहे. हुंडा घेणं हा कायद्यानं गुन्हा (Crime) असला तरी आपल्या समाजात आजही ते प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. हुंडा देणं आणि हुंडा घेणं या दोन्ही पद्धतींना प्रतिष्ठा चिकटली असल्यामुळे सुशिक्षित घरातही हुंडाबळीच्या घटना घडत असल्याचं दिसून येत असतं. मात्र काही तरुण या प्रथेला कडाडून विरोध करत असून आपल्या कृतीतून ते हुंडा घेणाऱ्यांना आरसाच (Set an example) दाखवू पाहत आहेत. आपल्याला मिळणारा हुंडा नाकारून एका तरुणाने अनोखा आदर्श निर्माण केला आहे.

हुंडा आणि वस्तूही नाकारल्या

हरियाणातील रोहतक भागात राहणाऱ्या संजीत नेहरा या तरुणाचं लग्न ठरलं होतं. या लग्नासाठी सासरच्या मंडळींनी लाखो रुपयांचा हुंडा देण्याची तयारी दाखवली होती. मात्र आपण काहीही झालं तरी लग्नात हुंडा घ्यायचा नाही, हा निर्णय़ त्यानं पक्का केला होता. त्याने लग्न ठरल्यानंतर आपल्या सासरच्या मंडळींना आपला निर्णय स्पष्टपणे कळवून टाकला. आपण लग्नात हुंडा घेणार नसल्याचं सांगत त्यानं सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. त्याच्या या निर्णयाचं सर्वांनाच कौतुक वाढलं आणि होणाऱ्या पत्नीचा त्याच्याविषयीचा आदर कमालीचा वाढला.

वस्तूही नाकारल्या

संजीतने केवळ हुंडाच नव्हे, तर लग्नात दिल्या जाणाऱ्या वस्तूदेखील नाकारल्या. लग्नाच्या रुखवतात दिली जाणारी भांडीकुंडी आणि इतर संसारोपयोगी वस्तूदेखील आपण घेणार नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं. हुंडा न घेणं यात काहीही विशेष नसल्याचं सांगत तो घेणं हे कायदेशीर आणि नैतिकदृष्ट्यादेखील चुकीचं असल्याचं मत त्यानं व्यक्त केलं आहे. हरियाणातील एका सरकारी कंपनीत क्लार्क म्हणून काम करणाऱ्या संजीतनं आपल्या कृतीनं सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे.

नवरीला नेलं बाईकवरून

लग्नात कुठलाही बडेजाव न करता त्यानं आपल्या पत्नीला चक्क मित्राच्या बाईकवरून घरी नेलं. लोकांनी लग्नात अनावश्यक खर्च करू नये आणि तो पैसे संसारासाठी वापरावा, हा संदेश त्याने त्यातून दिला आहे.

हे वाचा - आपण मजूर आहात का? सहकार विभागाची प्रविण दरेकरांना नोटीस

व्यक्तीपेक्षा पैसा मोठा नाही

व्यक्तीपेक्षा पैसा कधीच मोठा असू शकत नाही, अशी प्रतिक्रिया संजीतनं दिली आहे. ज्या व्यक्तीला आपण साता जन्माचे सोबती म्हणून घरी आणत आहोत, त्याच्याकडून पैशांची मागणी करणं हे मनाला न पटणारं असल्याची प्रतिक्रिया त्यानं दिली आहे. संजीतच्या या निर्णयाचं सर्व स्तरातून जोरदार कौतुक होत आहे.

First published:
top videos

    Tags: Bridegroom, Marriage, Wife and husband