मराठी बातम्या /बातम्या /देश /

अवघ्या 17 मिनिटांमध्ये पार पडला विवाहसोहळा, लग्नात नवरदेवानं मागितलेल्या अनोख्या गिफ्टची रंगली चर्चा

अवघ्या 17 मिनिटांमध्ये पार पडला विवाहसोहळा, लग्नात नवरदेवानं मागितलेल्या अनोख्या गिफ्टची रंगली चर्चा

केवळ सतरा मिनिटांमध्ये एक लग्नसोहळा (Marriage Function) पार पडला आहे. यात चर्चेचा विषय ठरतोय तो नवरदेवानं (Groom) लग्नात मागितलेलं गिफ्ट (Gift).

  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 15 मे : कोरोनाच्या (Coronavirus) कठीण काळातही काही सकारात्मक घटना लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणत आहेत. अशाच एक घटनेत केवळ सतरा मिनिटांमध्ये एक लग्नसोहळा (Marriage Function) पार पडला आहे. यात चर्चेचा विषय ठरतोय तो नवरदेवानं (Groom) लग्नात मागितलेलं गिफ्ट (Gift). या लग्नात ना बँडबाजा होता, ना वराती आणि ना कार. केवळ नवरदेव-नवरी (Bride) आणि दोन्ही कुटुंबातील काही सदस्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला. हे अनोखं लग्न उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) शाहजहांपूरमधील पटना देव कली मंदिरात झालं. या लग्नाचा मुख्य उद्देश हुंडा प्रथेला विरोध करणं हा होता आणि त्यामुळेच या अनोख्या लग्नाची परिसरात चर्चा रंगली.

केवळ सतरा मिनिटांमध्ये झालेल्या या लग्नाबाबत ऐकून तुम्ही आश्चर्यचकीत झाला असालच मात्र लग्नात नवरदेवानं मागितलेलं गिफ्ट ऐकून तुम्ही हैराणही व्हाल. कलान ठाण्याच्या क्षेत्रातील सनाय गावाचे रहिवासी असलेल्या पुष्पेंद्र हे गावातच एक शिक्षण संस्था चालवतात. त्यांचा विवाह हरदोईच्या प्रीति तिवारी हिच्यासोबत ठरला. पुष्पेंद्रनं वरातीस आणि हुंडा घेण्यास आधीच नकार दिला होता. अशात कोरोना कर्फ्यू दरम्यान ठरलेल्या मुहूर्तावर पटना देव कली स्थित शिव मंदिरात दोघांनी सात फेरे घेत अवघ्या सतरा मिनिटांमध्ये लग्न केलं.

कोणत्याही मोठ्या खर्चाशिवाय आणि केवळ सतरा मिनिटांत हे लग्न झालं. या लग्नाची अधिक चर्चा रंगली ती नवरदेवानं हुंड्यामध्ये मागितलेल्या वस्तूची. या नवरदेवानं हुंडा म्हणून केवळ एक रामायण घेतलं. तेदेखील सासरकडच्या मंडळींनी खूप आग्रह केल्यामुळे. पुष्पेंद्र आणि प्रीति यांनी इतरांनाही असं आवाहन केलं, की अनावश्यक खर्च आणि हुंडा घेण्याची प्रथा मोडीत काढत साध्या पद्धतीनं लग्न करावं. त्यांच्या या निर्णयाचं सध्या सगळीकडेच कौतुक होत आहे.

First published:

Tags: Lockdown, Marriage, Wedding