हैद्राबाद, 25 जून : कोणत्याही कामासाठी आता आधारचा मोठा आधार असतो. तुम्हाला अनोक गोष्टींशी जोडून ठेवण्यासाठी आधार महत्त्वाचं. पण, आता याच आधार कार्डमुळे लग्न मोडल्याची घटना आंध्र प्रदेशमध्ये समोर आली आहे. आधार कार्ड पाहिल्यानंतर नवऱ्या मुलानं लग्नास नकार दिला. त्यानंतर तो आपल्या नातेवाईकांसह तावातावानं लग्न मंडपासून बाहेर देखील निघून गेला. आता आधारमुळे लग्न कसं मोडलं हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. तर, आधार कार्डवरील जातीचा उल्लेख आणि वधू पक्षानं सांगितलेली जात यामध्ये फरक दिसून आला. त्यामुळे वर पक्षानं लग्न मोडलं. त्यानंतर हे सारं प्रकरण आता पोलिसांकडे गेलं असून पोलीस सध्या तपास करत आहेत.
अॅम्ब्युलन्स न मिळाल्यानं वडिलांनी 8 वर्षाच्या मुलाचा मृतदेह नेला खांद्यावरून
कुठे आणि नेमका काय घडला प्रकार?
गुंटूर जिल्ह्यामध्ये गडेवरिपलम नावाचं गाव आहे. या गावतील एका शेतकऱ्याच्या मुलीचं लग्न होतं. यावेळी लग्नाचं प्रमाणपत्र देण्यासाठी ब्राह्मणानं आधार कार्डची मागणी केली. यावेळी नवरी मुलीच्या वडिलांच्या आधार कार्डवरील नावामध्ये आणि इतर कागदपत्रांवरील नावामध्ये फरक होता. त्यावर वर पक्षानं आक्षेप घेत लग्नास नकार दिला. नवऱ्या मुलानं देखील लग्न करणार नाही असं सांगितलं.
आणीबाणीची 44 वर्षे; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेअर केला व्हिडीओ
प्रकरण पोलीस ठाण्यात
दरम्यान, आधार कार्डवर रेड्डी आडनाव नसल्यानं दोन्ही घरांमध्ये वाद झाला. वधू पक्षानं यावेळी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण, वर पक्ष मात्र नकारावर ठाम होता. नवरी मुलीनं देखील समजवण्याचा प्रयत्न केला पण, नवरा मुलगा ऐकायला तयार नव्हता. त्यामुळे नवऱ्या मुलीनं पोलीस ठाणे गाठत न्यायाची मागणी केली. पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीला देखील आता सुरूवात केली आहे.
वर पक्ष फरार
पोलीस ठाण्यात तक्रार झाल्यानंतर नवरा मुलगा आणि मंडळी फरार आहेत. पोलीस नातेवाईकांकडे याबद्दल चौकशी करत आहेत.
VIDEO: पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचला महिलेचा जीव