Home /News /national /

नवरदेवाला चैन पडेना; नवरीला आणण्यासाठी होडीतून निघाली वरात, पाहा VIDEO

नवरदेवाला चैन पडेना; नवरीला आणण्यासाठी होडीतून निघाली वरात, पाहा VIDEO

नवरदेवाला होडीत बसवलं आणि वरातीत गावकऱ्यांनी मनसोक्त डान्स केला.

    मुजफ्फरपुर, 11 ऑगस्ट : कोरोनामुळे अनेकांची लग्न टांगणीला लागली आहे. त्यातही काहींनी कसंबसं लग्न उरकून घेतलं. कोरोनाबरोबरच पावसानेही अनेक राज्यांना पूरतं झोडपून काढलं आहे. मात्र काही नागरिक यातही कसा आनंद शोधतात याचं एक उदाहरण म्हणजे बिहारमधील हे लग्न. बिहारचे (Bihar Flood) पूरपरिस्थितीत जगण्याबरोबर त्यातही आनंद शोधून काढतात. मुजफ्फरपुर (Muzaffarpur) मध्ये असाच प्रसंग पाहायला मिळाला. येथे रस्त्यांवर गुडघाभर पाणी भरलेलं असतानाही आपल्या नवरीला आणण्यासाठी नवरदेवाने पूराचीही पर्वा केली नाही. पूराच्या पाण्यात नाचतगाजत वऱ्हाड्यांसह तो लग्नमंडपात (Marriage) पोहोचला. या अनोख्या लग्नात गावकरींही आनंदात सहभागी झाले. समस्तीपुरहून आलं होतं वऱ्हाड  आई थी बारात वरात समस्तीपुर येथील मुसापुर गावातून मुजफ्फरपुरमधील भटण्डी गावात आली होती. मुसापुरचे मोहम्मद इक्बाल यांचा पूत्र मोहम्मद हसन रजा आणि सकरा भटण्डी गावातील मरहूम मोहम्मद शहीदद यांची कन्या मजदा खातून यांचा निकाह ठरवला होता. यादरम्यान मुरौलच्या मोहम्मदपुर कोठीमधील तिरहुत नहरचा तटबंध तुटला त्यामुळे गावात पूरपरिस्थितीत निर्माण झाली. निकाहची तारीख बदलण्यावर दोन्ही पक्षांनी विचार केला मात्र तारीख बदलण्यावर फार सकारात्मक प्रतिक्रिया नसल्याने त्याच तारखेला लग्न ठरवलं आणि पाण्याने भरलेल्या गावात वऱ्हाड्यांनी दणक्यात डान्स केला. आणि निकाह पार पडला.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Marriage

    पुढील बातम्या