Home /News /national /

आनंदावर कोसळला दुःखाचा डोंगर! लग्नादिवशीच नवरदेवाला हार्ट अटॅक

आनंदावर कोसळला दुःखाचा डोंगर! लग्नादिवशीच नवरदेवाला हार्ट अटॅक

लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरदेवाला (Groom died of heart attack one day before marriage) मृत्यू आल्यामुळे कुटुंबासह पूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

    मनाली, 7 नोव्हेंबर: लग्नाच्या आदल्या दिवशीच नवरदेवाला (Groom died of heart attack one day before marriage) मृत्यू आल्यामुळे कुटुंबासह पूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. लग्नाची तयारी सुरू असताना अचानक नवरदेवाच्या छातीत दुखू लागलं आणि (Pains in chest and heart attack) काही क्षणांत त्याचा मृत्यू झाला. ज्याच्या लग्नासाठी जोरदार तयारी सुरू होती, त्याचा असा अचानक मृत्यू झाल्यामुळे कुटुंबीयांसह (Grief in the village) संपूर्ण गाव दुःखात बुडालं. लग्नाच्या तयारीत सगळे व्यस्त हिमाचल प्रदेशातील ऊना जिल्ह्यातील एका तरुणाचं लग्न ठरलं होतं. 32 वर्षांच्या या तरुणाला मनासारखी जोडीदार मिळाली होती. आपलं लग्न होऊन संसाराला सुरुवात होणार, याचं सुखस्वप्न तो पाहत होता. त्याच्या घरचेही खुश होते आणि लग्नासाठी सर्व तयारी करत होते. रविवारी लग्नाचा मुहूर्त ठरला होता. शनिवारी रात्री वऱ्हाड बरेलीला जाणार होतं आणि रविवारी लग्न उरकून नववधूला घेऊन परत येणार होतं. घरात लग्नासाठी पाहुणेमंडळी, मित्रमंडळी जमली होती. घरात आनंदाचं, उत्साहाचं वातावरण होतं. अचानक छातीत कळ शनिवारी सगळेजण बरेलीला निघण्याच्या तयारीत होते. काहीजण खाद्यपदार्थांवर ताव मारत होते, तर काही पाहुणेमंडळी थट्टा मस्करी करण्यात रंगली होती. अशात अचानक नवरदेवाच्या छातीत कळ आली. तो मटकन खाली बसला आणि दोन्ही हातांनी छातीपाशी घट्ट दाबून धरत जोरजोराने श्वास घेऊ लागला. सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र असणारा नवरदेवच खाली कोसळल्यावर सगळेजण त्याच्याकडे धावले. त्याची अवस्था पाहून त्याला हृदयविकाराचा धक्का आल्याचं सर्वांना समजलं. हे वाचा- जोडप्यानं चालवलं डोकं, कमी खर्चात केलं शानदार लग्न हार्ट अटॅकने मृत्यू छातीत कळ आलेल्या नवरदेवाला उपचारासाठी तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न घरच्यांनी केला. मात्र हृदयविकाराचा हा झटका इतका तीव्र होता की त्यात त्याचा मृत्यू झाला. लग्नाच्या आदल्या दिवशी, पाहुण्यांनी भरलेल्या घरात नवरदेवाचा मृत्य झाल्यामुळे होत्याचं नव्हतं झालं. हसत्या खेळत्या घरावर अचानक दुःखाचा डोंगर कोसळला. कुटुंबीय आणि नातेवाईकांसोबत या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
    Published by:desk news
    First published:

    Tags: Bridegroom, Heart Attack, Himachal pradesh

    पुढील बातम्या