मराठी बातम्या /बातम्या /देश /

लग्नानंतर काही मिनिटांतच नववधू झाली विधवा, पतीला आला हार्ट अटॅक

लग्नानंतर काही मिनिटांतच नववधू झाली विधवा, पतीला आला हार्ट अटॅक

लग्नाला काही मिनिटं झाली असताना अचानक तरुणाला हार्ट अटॅक आल्यामुळे (Groom died in minutes after marriage due to heart attack) त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

  • Published by:  desk news

पटना, 30 नोव्हेंबर: लग्नाला काही मिनिटं झाली असताना अचानक तरुणाला हार्ट अटॅक आल्यामुळे (Groom died in minutes after marriage due to heart attack) त्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्न करून नववधूला घरी घेऊन आलेल्या तरुणाला (Youth feeling unwell from previous day) अचानक चक्कर आली. नातेवाईकांनी घाईगडबडीत त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली.

लग्नापूर्वीही आली होती चक्कर

बिहारच्या चंपारण जिल्ह्यातील बेतिया भागात राहणाऱ्या मनिष गिरी नावाच्या तरुणाचं चंदा नावाच्या तरुणीसोबत लग्न होतं. लग्नाच्या आदल्या रात्री मनिषला चक्कर आली होती. मात्र लग्नाच्या दगदगीमुळे त्याला चक्कर आली असावी, असं सर्वांना वाटलं होतं. त्यावेळी काही मिनिटांची विश्रांती घेऊन तो पुन्हा कामाला लागला होता. त्यानंतर लग्नसोहळा कुठल्याही संकटाविना शांततेत पार पडला.

लग्नाच्या पहाटे पुन्हा चक्कर

मध्यरात्री सुमारे तीन वाजण्याच्या सुमाराला लग्नाचे सर्व सोपस्कार पार पडले आणि मनिष नववधूला घेऊन घरी आला होता. घरी आल्यानंतर काही वेळातच त्याला पुन्हा एकदा चक्कर आली. त्या अवस्थेत त्याच्या नातेवाईकांनी मनिषला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. दोन दिवसांपूर्वी जो प्रकार घडला, तसाच हा प्रकार असावा असं नातेवाईकांना वाटलं. थोड्याच वेळात जुजबी उपचार करून डॉक्टर मनिषला डिस्चार्ज देतील, अशी नातेवाईकांची अपेक्षा होती. मात्र डॉक्टरांनी मनिषचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आणि नववधूच्या पायाखालची जमीनच सरकली.

हे वाचा- तुम्हालाही झोपेत बडबडण्याची सवय आहे का? जीवनशैलीत असा बदल ठरेल गुणकारी

लग्नाच्या रात्रीच मनिषला हार्ट अटॅक आल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. काही मिनिटांपासून नववधू म्हणून घरात आलेली चंदा आता विधवा झाली होती. घरातील उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण बदलून आता दुःखाचा डोंगर कोसळला होता. लग्नासाठी आलेल्या नातेवाईकांना त्याच्यावर अंत्यसंस्कार करूनच घरी परत जावं लागलं. या प्रसंगामुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.

First published:

Tags: Death, Marriage, Patna