वरातीत पत्नीसोबत केला धमाल डान्स, त्याच अंगणातून काही क्षणात निघाली नवरदेवाची अंत्ययात्रा

वरातीत पत्नीसोबत केला धमाल डान्स, त्याच अंगणातून काही क्षणात निघाली नवरदेवाची अंत्ययात्रा

लग्नात नवरदेवाने सगळ्यांना खूश करत धमाल डान्स केला पण नंतर असं काही झालं की संपूर्ण लग्नघर शोकाकूळ वातावरणात बुडालं.

  • Share this:

निजामाबाद, 23 फेब्रुवारी :  तेलंगणामध्ये लग्नाच्या 12 तासांच्या आत नवरदेवाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. लग्नात नवरदेवाने सगळ्यांना खूश करत धमाल डान्स केला पण नंतर असं काही झालं की संपूर्ण लग्नघर शोकाकूळ वातावरणात बुडालं. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या घटनेला काही दिवस उलटले असले तरी अद्यापही या घटनेची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे.

निजामाबाद जिल्ह्यातील बोधन शहरात ही घटना उघडकीस आली होती. गणेश असं मृत्यू झालेल्या 25 वर्षीय नवरदेवाचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेशने गुरुवारी बोधन शहरात लग्न केलं. त्यानंतर रात्री गावात वरात काढण्यात आली. वरातीमध्ये गणेश आणि त्याच्या पत्नीने धमाल डान्स केला. गणेश लग्नाच्या वरातीमध्ये इतक्या उत्साहाने नाचत होता की त्याला हृदयविकाराचा झटका आला.

कुटुंबातील सदस्यांनी त्याला तात्काळ जवळच्या रूग्णालयात दाखल केलं पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली. हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे होतं.  या घटनेमध्ये गणेश हा त्याच्या पत्नीसोबत वरातीमध्ये नाचत असतानाच त्याला हृदयविकारा झटका आला. त्याच्या अशा जाण्यामुळे संपूर्ण शहरात शोककळा पसली.

इतर बातम्या - पेट्रोलमुळे महिला 67 टक्के भाजली, जबाब देताना पीडितेची धक्कादायक माहिती

डीजेच्या मोठ्या आवाजामुळे तो अस्वस्थ झाला आणि त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप गणेशच्या कुटुंबीयांनी केला. गणेश आखाती देशातील एका कंपनीत काम करत असल्याची माहिती मिळाली. सात दिवसांपूर्वी तो आपल्या गावी आला होता. या प्रकरणाची पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

खरंतर गणेशच्या लग्नामुळे संपूर्ण घरात आनंदाचं वातावरण होतं. तो आणि त्याची पत्नी वरातीमध्ये धमाल डान्स करत होते. या नव्या जोडप्याचा आनंद पाहून सगळेजण खूश होते. पण या खुशीमध्ये अचानक दुखाचा डोंगर कोसळला. पतीच्या अशा जाण्यामुळे पत्नीलाही मोठा धक्का बसला.

इतर बातम्या - केजरीवाल तिसऱ्यांदा घेणार CM पदाची शपथ, रामलीला मैदानात 1 लाख लोकांची उपस्थिती

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 16, 2020 09:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading